शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

एक कोटीची जागा मनपाच्या ताब्यात

By admin | Updated: September 7, 2016 00:38 IST

औरंगाबाद : ज्योतीनगर भागातील रोहिणीनगर येथील ५ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून त्याची परस्पर विक्री करण्याचा घाट काही

औरंगाबाद : ज्योतीनगर भागातील रोहिणीनगर येथील ५ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून त्याची परस्पर विक्री करण्याचा घाट काही भूखंड माफियांनी घातला होता. या भागातील लोकप्रतिनिधी शिल्पाराणी वाडकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करीत तब्बल १ कोटी रुपयांची जागा ताब्यात घेतली.रोहिणीनगर येथील मनपाच्या जागेवर काही वर्षांपूर्वी अतिक्रमण करण्यात आले. महापालिका प्रशासन या जागेकडे लक्ष देत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांनी परस्पर पी.आर. कार्डवर नावही टाकून घेतले. पी.आर. कार्डवर प्लॉट क्रमांक टाकण्याची प्रक्रिया शिल्लक होती. या भागातील नगरसेविका वाडकर यांनी मनपाकडे यासंदर्भात वारंवार तक्रार केली. मनपा अधिकारी कारवाईचे फक्त नाटक करीत होते. यापूर्वी अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी मनपाचे अधिकारी घटनास्थळावर गेले. मात्र, अतिक्रमण करणाऱ्याने स्वत:हून दोन खोल्या पाडून टाकल्या. आणखी एक खोली ५ हजार चौरस फूट जागेवर बांधलेली होती. बाजारभावानुसार या जागेची किंमत किमान १ कोटी रुपये आहे. मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेत वाडकर यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रशासनाने नगररचना विभागाचा अभिप्राय घेतला. ४मालमत्ता विभागाचे अधिकारी शेख शफी यांचा अभिप्राय घेतला. उपायुक्त रवींद्र निकम यांनी त्वरित अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. सायंकाळी इमारत निरीक्षक राचतवार यांनी कारवाई करीत अतिक्रमण जमीनदोस्त केले. १ कोटी रुपयांची संपूर्ण जागा मालमत्ता विभागाने ताब्यात घेतली.