शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

मारहाण प्रकरणी एकास सक्तमजुरी

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

उस्मानाबाद : एकास लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एका आरोपीस उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱऔटी यांनी सहा महिने सक्तमजुरी

उस्मानाबाद : एकास लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एका आरोपीस उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱऔटी यांनी सहा महिने सक्तमजुरी व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना कसई (ता़तुळजापूर) येथे २ फेब्रुवारी रोजी घडली होती़याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसई येथील सचिन पांडुरंग बनसोडे हे त्यांच्या विटभट्टीवर थांबले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या यशपाल विलास लबडे (रा़मंगरूळ) याने ‘पांड्या कोठे आहे’ अशी विचारणा केली़ त्यावेळी सचिन बनसोडे याने ‘माझ्या वडिलांचे नाव पांडूरंग आहे, तू तोंडाने नीट बोल’ असे म्हणताच यशपाल लबडे याने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली़ विटभट्टीवरील कामगारांनी भांडण सोडवासोडव केली़ याबाबत सचिन बनसोडे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून यशपाल लबडे याच्याविरूध्द गुरनं ८/२०१५ कलम ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तपासादरम्यान कलम ३ (१) (१०) अ़जा़ज़अ़प्र कायद्यानुसार कलम वाढविण्यात आले होते़ या गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱ औटी यांच्यासमोर झाली़ सरकार पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले़ सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़आऱ औटी यांनी आरोपी यशपाल विलास लबडे याला भादंवि कलम ३२४ अन्वये सहा महिने सक्तमजुरी व ५०० रूपये दंड, दंड न दिल्यास आणखी एक आठवड्याची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली़