शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

७० हजार रुपयांच्या लाचेच्या गुन्ह्यात अव्‍वल कारकुनासह एकाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चार वर्षांनंतर गजाआड औरंगाबाद : चार वर्षांपूर्वी खिडकीचे ग्रील व जाळी तोडून कपाटातील ६५ ...

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चार वर्षांनंतर गजाआड

औरंगाबाद : चार वर्षांपूर्वी खिडकीचे ग्रील व जाळी तोडून कपाटातील ६५ हजारांचे दागिने चोरून फरार झालेला आरोपी शंकर तान्‍हाजी जाधव याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

---------------------------------------------------

एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

औरंगाबाद : बेडरूमच्‍या उघड्या दारातून घरात प्रवेश करून एक लाख १० हजार रोख रक्कम आणि चार मोबाईल असा सुमारे एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरणारे निसार कौसर खान, अभिषेक राजू वाघमारे, अमन फिरोज शेख आणि राहुल विनायकराव ससाणे या चौघांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

-------------------------------------------------

११ महिन्‍यांनंतर मंगळसूत्र चोर पकडला

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या ६२ वर्षांच्या वृद्धेची ६० हजार रुपये किमतीची सोन्‍याची पोत हिसकावणारा चोरटा वैभव गजानन इंगोले याला तब्बल ११ महिन्‍यांनंतर पोलिसांनी अटक केली. त्‍याला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

----------------------------------------------------

जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या पिता-पुत्राला पोलीस कोठडी

औरंगाबाद : शेतातील सामायिक बांधावरून चुलत भावानेच भावासह त्‍याची पत्‍नी व मुलाला फावडे आणि सळईने जबर मारहाण करुन जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न केल्याच्या गुन्ह्यात मनोहर विठ्ठल गाडेकर आणि त्याचा मुलगा सुरेश मनोहर गाडेकर या दोघांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी आर. व्‍ही. सपाटे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

----------------------------------------------------

दोन तरुणांना आत्‍महत्‍येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांना जामीन नाकारला

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंप्री (वरुड) येथील दोन तरुणांना आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात शेख मोईन मोहम्मद सुभान, मुस्‍ताक गफुरखान पठाण आणि मनीषा संजय काळे या तिघांचा नियमित जामीन अर्ज सत्रन्‍यायाधीश ए. आर. कुरेशी यांनी बुधवारी नामंजूर केला. सरकारतर्फे सहायक लोकअभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

-----------------------------------------------------

परप्रांतीय दोघे मोबाईल चोरटे तुरुंगात रवाना

औरंगाबाद : नारळीबाग परिसरातून मोबाईल चोरणारे तामिळनाडू राज्यातील कार्तिक श्रीनिवास आणि गुना बाबू गोपाल या दोघांची न्‍यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी बुधवारी दिले.