शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत २४ तासांत दीड टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:35 IST

गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, नाशिककडून येणाºया पाण्याचा ओघ वाढला आहे.गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, धरण ८६.५४ टक्के भरले आहे. जून ते आॅगस्टदरम्यान पावसाने मोठी दडी मारल्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आॅगस्ट महिनाअखेर अतिवृष्टी झाल्यामुळे जायकवाडीच्या पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली.शनिवारी सकाळपर्यंत जायकवाडीमध्ये १८ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, धरणात ६६.३४ टीएमसी जिवंत पाणी साठा आहे. विशेष म्हणजे जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण आवक ६३.८३ टीएमसी झालेली आहे. जायकवाडीने ९४ टक्के पातळी ओलांडल्यावरच विसर्ग करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे कडा कार्यालयाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांच्या संदर्भाने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. ते म्हणाले की, नाशिककडून प्रतिदिन ३५ ते ४० हजार क्युसेक पाण्याची आवक झाली तर जायकवाडीची पातळी झपाट्याने वाढून पाणी सोडण्याचा विचार करावा लागेल; मात्र सध्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू नाही. त्यामुळे धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी अजून कालावधी बाकी आहे.