शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शहरावर दीड हजार सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:14 IST

औरंगाबाद : सेफ सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल दीड हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच शहराला बसविण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सेफ सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल दीड हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच शहराला बसविण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. याशिवाय पोलिसांचे मोबाइल अ‍ॅप, नवीन संकेतस्थळ आणि वाहतूक नियमांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती घडविण्यासाठी चौकाचौकांत लावण्यात आलेल्या शंभराहून अधिक होर्डिंगचेही औपचारिक उद्घाटन यावेळी करण्यात आले. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जाहीर केलेल्या संकल्पनेला दोन महिन्यांत मूर्तरूप येण्यास सुरुवात झाली.पोलीस आयुक्तालयातर्फे शहरात दुसऱ्या टप्प्यात दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्रारंभ, वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारे फलक, पोलीस आयुक्तालयाचे नवीन संकेतस्थळ आणि पोलीस न्यूज अ‍ॅपचा शुभारंभ विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२०) एमजीएममधील रुख्मिणी सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. इम्तियाज जलील, आ. सतीश चव्हाण, आ. सुभाष झांबड, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, जि.प. सीईओ मधुकरराजे आर्दड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, राहुल श्रीरामे यांची उपस्थिती होती.यावेळी भापकर म्हणाले की, चांगले-वाईट काम करणाऱ्यावर देव वरून नजर ठेवतो आणि देव तुम्हाला शिक्षाही देतो, असे आपण म्हणायचो. आता मात्र तुमच्या प्रत्येक गैरकृत्यावर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमऱ्यांची नजर असेल आणि तुम्ही चूक केली तर तुम्हाला सजाही ते देतील. नव्या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालता येतो. या उपक्रमाबद्दल पोलीस आयुक्तांचे त्यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, अपघातात अनेकांचे प्राण जातात. यामुळे वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांनी लावलेले होर्डिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळसह पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी देशविदेशातील लाखो लोक औरंगाबादेत येतात. या शहराचे रस्ते, स्वच्छता आणि सीसीटीव्ही बसविण्याच्या कामासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. यावेळी महापौर घडामोडे, आ. सावे, आ. जलील, आ. शिरसाट, आ. झांबड यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वी यादव यांनी प्रास्तविक केले. डॉ. दीपाली धाटे यांनी आभार मानले.