शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आठ तालुक्यांत दीड हजार उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जिंतूर तालुका वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये सदस्य पदासाठी १ हजार ४३९ तर सरपंच पदासाठी २४५ असे १ हजार ६८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जिंतूर तालुका वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये सदस्य पदासाठी १ हजार ४३९ तर सरपंच पदासाठी २४५ असे १ हजार ६८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़गंगखेडमध्ये ११५ उमेदवार रिंगणातगंगाखेड- तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९ तर सदस्य पदासाठी ४५ उमेदवारांनी माघार घेतली़ त्यामुळे आता सरपंच पदासाठी ३७ तर सदस्य पदासाठी १७८ उमेदवार रिंगणात आहेत़नागठाणा व सिरसम या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़ शंकरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत़ घटांग्रा ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत़ बेलेवाडी येथे सरपंच पदासह इतर सहा सदस्य बिनविरोध निवडून आले. शंकरवाडी येथे सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, सात पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत़ रुमणा जवळा ग्रा.पं.त ९ उमेदवारांनी माघार घेतली असून, प्रभाग क्रमांक ३ मधील दोन जागा बिनविरोध आल्या आहेत़ महातपुरी ग्रा.पं.त ४ जागा बिनविरोध झाल्या असून, ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत़ नागठाणा ग्रामपंचायतीचे सरपंचपद व ७ सदस्य बिनविरोध झाले आहेत़ सिरसम ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत़ त्यामुळे आता ९ सरपंचांसाठी ३७ तर सदस्यपदासाठी १७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़मानवत: बहुतांश गावांत थेट लढतीतालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी १३ तर सदस्य पदासाठी ३२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, बहुतांश गावांत दुरंगी लढत होत आहे़ देवलगाव आवचार येथे सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत़ कोल्हावाडी येथील सरपंचपदासाठी २ तर सदस्य पदाच्या ७ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत़ मानोली ग्रा.पं.मध्ये मांडे गटाचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत़ सरपंच पदासाठी ३ उमेदवारांत लढत असून, जि़प़ सदस्य विष्णू मांडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ बाजार समितीचे उपसभापती पंकज आंबेगावकर आणि त्यांचे प्रतीस्पर्धी संतोष जाधव यांनी येथील निवडणुकीत रंगत आणली आहे़ या ठिकाणी सरपंच पदासाठी २ तर सदस्यांच्या ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत़ सोनूळा येथे सरपंच पदासाठी २ उमेदवार रिंगणात आहेत़ या ठिकाणी चार सदस्य बिनविरोध झाले आहेत़ उर्वरित ३ जागांसाठी सहा उमेदवार लढतीत आहेत़ वझूर बु़ येथे ८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित एका जागेसाठी दोघे रिंगणात आहेत़ सरपंच पदासाठी सरळ लढत आहे़ रत्नापूर येथे सरपंच पदासाठी ३, सदस्यांच्या ७ पदासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत़पाथरी तालुक्यात १३६ उमेदवारपाथरी- तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य पदासाठी १३६ उमेदवार रिंगणात आहेत़ बुधवारी सरपंच पदासाठी १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ उमेदवार रिंगणात आहेत़ तर ५९ सदस्य पदासाठी ४४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ११८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़