शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

घरच्या बिलासाठीच ओम राजेंचे आंदोलन

By admin | Updated: July 1, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : नाफेडकडे थकलेल्या शेतकऱ्यांच्या पैशासाठी जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर आ़ ओमराजे यांनी केलेले आंदोलन केवळ स्टंटबाजी होते़

उस्मानाबाद : नाफेडकडे थकलेल्या शेतकऱ्यांच्या पैशासाठी जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर आ़ ओमराजे यांनी केलेले आंदोलन केवळ स्टंटबाजी होते़ झालेले आंदोलन हे केवळ घरचे आणि कार्यकर्त्याचे पैसे काढण्यासाठी करण्यात आल्याचे कागदपत्रांचा दाखला देत माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले़ शेतकऱ्यांचे पैसे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदारांनी हे आंदोलन करून स्टंटबाजी केल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केले़येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी उद्भव योजनेचे बार्शीपर्यंत चाचणी झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी आंदोलनाची स्टंटबाजी केली होती़ त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे नाफेडकडे थकलेल्या पैशासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर स्टंटबाजीचे आंदोलन केले. आमदारांनी आंदोलनाचे पत्र दिले त्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी नाफेडकडून जवळपास दोन कोटी रूपये निधी कार्यालयास प्राप्त झाला होता़ त्यानंतर आंदोलनाची स्टंटबाजी करण्यात आली़ हरभरा घातलेल्या क्रमांकानुसार शेतकऱ्यांना पैसे वाटप करणे गरजेचे होते़ मात्र, मे महिन्यात हरभरा घातलेल्या १६ जणांचा प्राधान्यक्रम डावलून स्वत:च्या कुटूंबातील सदस्यांसह कार्यकर्त्यांचे पैसे काढण्यात आले़ यात आमदारांच्या पत्नी संयोजनी ओमप्रकाश निंबाळकर व आमदारांच्या बंधूंच्या पत्नी देविका जयप्रकाश निंबाळकर यांच्या नावाचाही समावेश आहे. यात १ मे रोजी भिमराव कावळे, अंबऋषी क्षीरसागर, दिनेश डोके यांच्यासह एकूण १८ जणांनी हरभरा घातला होता़ मात्र, त्यातील केवळ देविका जयप्रकाश निंबाळकर व संयोजनी ओमप्रकाश निंबाळकर यांचे पेमेंट अदा करण्यात आले आहे़ त्यानंतर २ मे पासून २३ मे पर्यंत रामराव शिवराम शिंदे (क्ऱ३६१) यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी हरभरा घातला़ मात्र, २३ मे रोजी हरभरा घातलेले नितीन नेताजीराव भोसले (क्ऱ७२६) यांचे पेमेंट अदा करण्यात आले़ शेतकरी म्हणून स्थानिक आमदारांच्या घरची मंडळी आणि जवळच्या कार्यकर्त्यांना मिळालेले पैसे पाहता इतर शेकडो शेतकऱ्यांना का पेमेंट अदा करण्यात आले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. १६ शेतकऱ्यांचे वजन मे महिन्यात झालेले असतानाही त्यांनी खासगी अडचणी सांगितल्याने पेमेंट दिल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे़ त्यामुळे आमदारांचे हे आंदोलन स्वत:चे पैसे काढण्यासाठी की शेतकऱ्यांसाठी होते असा प्रश्न पाटील यांनी केला. शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम डावललानाफेडकडील शेतकऱ्यांचे पैसे मिळविण्यासाठी नाफेडच्या दिल्ली येथील कार्यालयासमोर आंदोलन करणे गरजेचे आहे़ मात्र, घरच्या मंडळींच्या व कार्यकर्त्यांच्या नावे घातलेल्या हरभऱ्याचे पैसे काढण्यासाठी फेडरेशनच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ आंदोलनाची स्टंटबाजी होत असल्याने दबावात आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे तातडीने अदा केले. शेतकऱ्यांच्या पैशासाठी आंदोलन होते तर त्यांच्या अगोदर ते तुम्हाला कसे मिळाले, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.मी पैशाची मागणी केली नाहीमाजी राज्यमंत्री पाटील यांच्या आरोपाबाबत आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, इतर शेतकऱ्यांप्रमाणे मीही हरभरा घातला आहे़ त्या पैशासाठी मी कोणतीही लेखी, तोंडी मागणी केलेली नाही़ केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे पैसे मिळावे, यासाठीच केले होते़ आंदोलनावेळी पाच कोटी रूपये देण्यात येतील, असे पत्र देण्यात आले आहे़ ते पैसे माझ्या घरी येणार नाहीत़ शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्यास यापुढेही आपण वेळोवेळी आंदोलन करू, असेही ते म्हणाले़