शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

ओम राजेंचा तक्रारी अर्ज फेटाळला

By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव येथील मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात आ. ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव येथील मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात आ. ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश नायब तहसीलदार (निवडणूक) यांना दिले होते. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी सर्व संबंधितांची सुनावणी घेवून अहवाल सादर केला. मात्र संबंधित तक्रारदारांनी विहीत नमुन्यात आणि सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केला नसल्याचे सांगत, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तो फेटाळला आहे.खामगाव ग्रामपंचायतीने २०१४ च्या नवीन मतदार यादीमध्ये बोगस नावे समाविष्ट केली असून, संबंधित व्यक्ती गावात वास्तव्यास नाहीत, अशी तक्रार करुन या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच बोगस नावे यादीतून वगळावीत अशी मागणी तक्रारदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली होती. त्यावर गैरअर्जदार यांनी विधीज्ञांमार्फत म्हणणे दाखल केले. मतदार नोंदणी नियम १९६० मधील तरतुदीनुसार फॉर्म नं. ०७ मध्ये आक्षेप घेणे आवश्यक आहे.फॉर्म नं. ७ हा आक्षेप मतदार नोंदणी यांच्याकडे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे सदरील आक्षेप विचारात घेवू नये, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे मतदार नोंदणी नियम १३ नुसार ज्यांचे नाव संबंधित मतदार यादीमध्ये आहे असा व्यक्ती आक्षेप घेवू शकतो. मात्र तक्रारदार ओम राजे यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही. तसेच नियम ११ (ए) नुसार यादी लोकांच्या परिक्षणासाठी ठेवली जाते. नियम १२ अन्वये ३० दिवसात आक्षेप घ्यावा, असे नमूद आहे. मात्र आक्षेपकर्त्यांनी तसा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सदरील तक्रारदाराने केलेला आक्षेप फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद बेरोजगारांच्या वकिलांनी केला. त्यानुसार सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार उस्मानाबाद यांनी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद लक्षात घेवून ओम राजे यांचा तक्रारी अर्ज फेटाळला. तक्रारदारांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला नाही. तसेच अर्ज दाखल करताना मतदार नोंदणी नियमातील तरतुदी व विहीत पद्धती अनुसरली नसल्याचा ठपका ठेवला आहे. (प्रतिनिधी)