शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जुना मोंढा जिंकला, जाधववाडी हरली

By admin | Updated: July 14, 2015 00:33 IST

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जुना मोंढा विरुद्ध जाधववाडी असा सामना रंगला. जुना मोंढ्यातील घाऊक बाजार वगळल्याने तेथील

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जुना मोंढा विरुद्ध जाधववाडी असा सामना रंगला. जुना मोंढ्यातील घाऊक बाजार वगळल्याने तेथील १६० व्यापाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला. मात्र येथील व्यापाऱ्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवत निवडणूक लढवून जाधववाडीतील व्यापाऱ्यांना चारीमुंड्या चीत करीत दोन्ही उमेदवारांना निवडून आणले. हा जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांचा सामूहिक विजय ठरला. यामुळे मोंढ्यात सोमवारी दिवाळी साजरी करण्यात आली. जाधववाडीतील अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व माजी संचालक हरीश पवार व अडत व्यापारी संजय पहाडे या दोघांनी निवडणूक लढविली. जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी प्रशांत सोकिया व हरिशंकर दायमा या दोन व्यापाऱ्यांना मैदानात उतरविले. मतमोजणीत सुरुवातीपासून मोंढ्यातील दोन्ही उमेदवारांनी आघाडी कायम ठेवली. सोकिया यांनी ४४६ मते व दायमा यांनी ४२७ मते मिळवून विजय मिळविला. जाधववाडीतील कन्हैय्यालाल जैस्वाल यांना ३१३ मते तर संजय पहाडे यांना ३०५ मते मिळाली. जाधववाडीतील फळभाजीपाला अडत बाजारातील उमेदवार इसा खान यांनी चांगली लढत दिली. पण इलियास बागवान या उमेदवाराने १२६ मते ‘खाल्ल्याने’ इसा खान यांना ३०३ मते घेऊन पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अवघी २८७ मते मिळालेले हरीश पवार सहाव्या स्थानावर फेकले गेले. उल्लेखनीय म्हणजे जाधववाडीतील व्यवसायाचा परवाना नसल्याने जुन्या मोंढ्यातील १६० व्यापाऱ्यांना मतदान करता आले नाही. पण मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी प्रचारात झोकून दिले. मिरवणूक जुन्या मोंढ्यात आली तेव्हा तासभर फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. गुलालाची एवढी उधळण केली की, मोंढा गुलालमय झाला. मोंढ्यात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली. आम्हाला हरविण्याचा प्रयत्नच विरोधकांच्या अंगलट आला, स्थलांतराचा प्रश्न सोडविण्यापेक्षा राजकारण केले गेले, जाणूनबुजून त्रास दिला गेला, यास कंटाळून मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी आपला उमेदवार निवडून आणला’, अशी प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करीत होते.