शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या शहरातील नगरसेवक अलिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:25 IST

जुन्या शहरात कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. दररोज नागरिक कच-याला आग लावत असल्याने नागरिकांचा दम कोंडतोय. त्यातच नगरसेवक कचरा कोंडीपासून अलिप्त धोरण स्वीकारत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडी आणखी काही दिवस फुटण्याची शक्यता नाही. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात तरी कचरा प्रश्नात दिलासा मिळेल का? याकडे संपूर्ण महापालिकेचे लक्ष लागले आहे. जुन्या शहरात कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. दररोज नागरिक कच-याला आग लावत असल्याने नागरिकांचा दम कोंडतोय. त्यातच नगरसेवक कचरा कोंडीपासून अलिप्त धोरण स्वीकारत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.सिडको-हडकोसह चिकलठाणा, रामनगर, मुकुंदवाडी, जयभवानीनगर आदी अनेक वॉर्डांमध्ये कच-याची समस्या अजिबात नाही. दररोज जमा होणारा ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतोय. ओल्या कच-यावर शंभर टक्के प्रक्रियाही करण्यात येत आहे. कचरा कोंडीची झळ सर्वाधिक महापालिकेच्या झोन १, २ आणि ३ मध्ये बसली आहे. या तिन्ही झोनमधील सुमारे ४० पेक्षा अधिक वॉर्ड जुन्या शहरातील आहेत. या वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून कचरा कोंडी फोडण्यासाठी मनपा जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र, महापालिकेच्या यंत्रणेला अजिबात यश मिळत नाही. नगरसेवकही प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार नाहीत. बोटावर मोजण्याएवढ्याच नगरसेवकांनी सकाळी ६ ते १० मनपाच्या सफाई कामगारांसोबत जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. स्वत: हातात माईक घेऊन नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन नगरसेवक करीत आहेत. काही नगरसेवक कचरा प्रश्न शंभर टक्केप्रशासनाशी निगडित आहे, असे समजून हात झटकत आहेत. नगरसेवकाच्या रेट्यानंतरच कच-याचे वर्गीकरण होऊ शकते, असे घनकचरा विभागात काम करणा-या कर्मचा-यांचे म्हणणे आहे.वॉर्डनिहाय जनजागृती मोहीम मनपाने सुरू केली आहे. या मोहिमेकडे नगरसेवकच पाठ फिरवत असल्याने त्या निरर्थक ठरत आहेत.