शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कादराबाद भागात जुनी इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:49 IST

शहरातील कादराबाद भागातील जुनी इमारत शनिवारी रात्री कोसळली. पावसाचे पाणी इमारतीत मुरल्याने ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील कादराबाद भागातील जुनी इमारत शनिवारी रात्री कोसळली. पावसाचे पाणी इमारतीत मुरल्याने ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने या ठिकाणी कुणीही वास्तव्यास नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे शहरातील शंभरहून अधिक धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.कादराबाद भागातील उतारगल्लीमध्ये राम बुगदाने, विठ्ठल बुगदाने व मनोज बुगदाने यांची जुनी इमारत असून, बहुतांश भाग लाकडांपासून बनवलेला आहे. सदर इमारत मोडकळीस आल्याने बुगदाने कुटुंबीय काही महिन्यांपूर्वी दुसरीकडे वास्तव्यास गेले होते. जालना शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचे पाणी या जीर्ण इमारतीच्या भिंतीमध्ये मुरले. अगोदरच कमकुवत झालेली इमारत शनिवारी रात्री अचानक कोसळली. इमारतीला लागून उभी केलेली एक दुचाकी व सायकल माती व लाकडाच्या ढिगाºयाखाली दबली. इमारतीला लागून असलेल्या जुन्या मंदिराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जुना जालन्यातील कसबा, आनंदीस्वामी गल्ली, बाजार गल्ली, गणपती गल्ली, इंदरानगर भागातील बहुतांश इमारती मोडकळीस आल्या आहेत. या जुनाट इमारतींमधील लोकांच्या जीविताला धोका आहे. सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेला हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्याधिकाºयांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.सहा झोननवीन जालना भागात एकूण सहा झोन असून, त्यापैकी सदर बाजार झोनमधील धोकादायक इमारतींचा सर्व्हे जूनमध्ये करण्यात आला आहे. या भागात एकूण ३६ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आल्यानंतर तसा अहवाल प्रभाग निरीक्षकांनी पालिकेला सादर केला आहे. पालिकेने या भागातील धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसाही बजावल्या आहेत.