लातूर : शहरातील हनुमान चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नलचे उद्घाटन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले़ या कार्यक्रमाला मनपातील सत्ताधारी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी बगल देत बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले़ यातूनच मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-काँग्रेसमध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून शीतयुद्धाला सुरूवात झाल्याची चर्चा आहे़ या प्रकाराचा पालकमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला़ भविष्यात आम्ही मनपात सत्ताधारी म्हणून प्रवेश करू, त्यावेळी हे चित्र नक्कीच बदलू, असेही निलंगेकर म्हणाले़ जनता उन्हामध्ये आणि पुढारी सावलीत असा प्रकार भविष्यातील कुठल्याही कार्यक्रमात चालणार नाही़ पुढारी उन्हात थांबले तरी चालतील मात्र जनतेसाठी सावलीची व्यवस्था करावी, असे मनपा प्रशासनाला पालकमंत्र्यांनी खडसावले़शहरातील हनुमान चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नलच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी बोलत होते़ यावेळी खा़डॉ़ सुनील गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ शिवाजीराव राठोड, माजी महापौर अख्तर शेख, चंद्रकांत चिकटे, शैलेश गोजमगुंडे यांची उपस्थिती होती़
पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमावर सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार
By admin | Updated: March 11, 2017 23:45 IST