शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याची घोडचूक शेतकऱ्याच्या मुळावर !

By admin | Updated: May 17, 2017 00:27 IST

उस्मानाबाद : एखाद्या अधिकाऱ्याने केलेली घोडचूक किती महागात पडू शकते, हे कळंब तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांने अनुभवले.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : एखाद्या अधिकाऱ्याने केलेली घोडचूक किती महागात पडू शकते, हे कळंब तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांने अनुभवले. तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी नियमांचा चुकीचा अर्थ लावल्याने संबंधित शेतकऱ्याची जमीन सावकाराच्या पाशातून मुक्त होण्यास तब्बल दीड वर्ष विलंब लागला. विभागीय सहनिबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजविल्यानंतर कुठे शेतकऱ्यास न्याय मिळाला. कळंब तालुक्यातील मोहा येथील शमशोद्दीन हशमोद्दीन सय्यद यांनी १८ मार्च २००८ रोजी कळंब येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे अर्ज करून सावकाराच्या ताब्यातील जमीन परत मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल झाले. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेवून सदरील प्रकरण पंधरा वर्षापूर्वीचे असल्याने ते सावकारी अधिनियमात बसत नाही, असे नमूद करीत निर्णय शेतकऱ्याविरूद्ध दिला होता. या अधिकाऱ्याने शेतकऱ्याचा मूळ अर्जाचा (मार्च २०१८) विचारच केला नाही. आपल्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी सय्यद यांनी विभागीय सहनिबंधक, लातूर यांच्याकडे अपील दाखल केले असता, फेरसुनावणी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा उपनिबंधक के. बी. वाबळे यांना दिले. त्यानुसार या प्रकरणात उपनिबंधकांच्या दालनात दहापेक्षा अधिक सुनावण्या झाल्या. परंतु, गैरअर्जदाराने त्यांची बाजू मांडण्याऐवजी वेळोवेळी तांत्रिक मुद्याचा आधार घेत मुदतवाढ मागितली. मुदतवाढीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक वाबळे यांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे मार्गदर्शन मागितले. त्यानुसार २७ एप्रिल २०१७ रोजी मार्गदर्शन प्राप्त झाले असता, गैरअर्जदारास अंतिम युक्तीवाद करण्याची संधी देण्यात आली. परंतु, त्यांनी युक्तीवाद न करता मुदतवाढ मागितली. त्यामुळे उपनिबंधकांनी गैरअर्जदाराची मागणी फेटाळून लावत शेतकऱ्याचा अर्ज मंजूर केला. अवैध सावकारीच्या तारणापोटी गैरअर्जदार लताबाई पुरूषोत्तम तापडे व पुरूषोत्तम रतनलाल तापडे (रा. कळंब) यांनी शेतकरी सय्यद यांच्याकडून सावकारीच्या ओघात तारणापोटी करून घेतलेले खरेदीखत रद्द केले. तसेच जमिनीचा कायदेशीर ताबा संबंधित शेतकऱ्यास देण्याचे आदेश निर्गमित केले.