शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नवºयाच्या हातकड्या घेऊन पत्नी अधीक्षक कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:08 IST

शहरातील शिवाजीनगर भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला यथेच्छ धुलाईनंतर सोडून दिले, परंतु त्याच्या पायात घातलेल्या हातकडीचा मात्र पोलिसांना विसर पडला़ संशयिताने घरी येवून दगडाने ती हातकडी तोडली़ त्यानंतर ती हातकडी घेवून संशयिताच्या पत्नीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयच गाठले़ त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील शिवाजीनगर भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला यथेच्छ धुलाईनंतर सोडून दिले, परंतु त्याच्या पायात घातलेल्या हातकडीचा मात्र पोलिसांना विसर पडला़ संशयिताने घरी येवून दगडाने ती हातकडी तोडली़ त्यानंतर ती हातकडी घेवून संशयिताच्या पत्नीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयच गाठले़ त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़विमानतळ ठाणे हद्दीत झालेल्या एका चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी शिवाजीनगर भागातून एका संशयिताला ताब्यात घेतले़ त्यानंतर त्याला घेवून थेट त्यांनी अर्धापूर गाठले़ या ठिकाणी हे सर्वजण एका धाब्यावर जेवणासाठी थांबले़ जेवणादरम्यान सदर संशयित आरोपी पसार होऊ नये म्हणून या कर्मचाºयांनी त्याच्या पायात बेड्या घातल्या़ तत्पूर्वी त्याची यथेच्छ धुलाईही करण्यात आली़ या प्रकरणाची कुठेही नोंद करण्यात आली नव्हती, हे विशेष! मारहाणीनंतर पोलिसांनी या आरोपीला सोडून दिले़ यावेळी त्याच्या पायात घातलेली हातकडी काढून घ्यायचे पोलीस विसरले. त्यामुळे सदर इसमाने पायातील हातकडीसह थेट घर गाठले़ घरी आल्यानंतर दगडाने पायातील हातकडी तोडली, परंतु पुन्हा पोलीस येतील या भीतीने त्याने घरातून धूम ठोकली़नवरा हातकड्या टाकून घरातून गेल्यानंतर या हातकड्याचे करायचे काय? असा प्रश्न पत्नीसमोर उभा राहिला. पत्नीने सासूसह तुटलेल्या या हातकड्या घेऊन थेट वजिराबाद येथे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले़ परंतु त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाºयांनी सदर हातकड्या घेण्यास नकार देत त्यांना पिटाळून लावले़ त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला़ दरम्यान याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.