शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:17 IST

ऐन सण- उत्सवाच्या काळातही महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार सुरूच आहे. गणेश चतुर्थीपासून सातत्याने या भागात वीजपुरवठा खंडित होत असून शनिवारी रात्रभर खंडित झालेला वीजपुरवठा रविवारीही दिवसभर सुरळीत झाला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ऐन सण- उत्सवाच्या काळातही महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार सुरूच आहे. गणेश चतुर्थीपासून सातत्याने या भागात वीजपुरवठा खंडित होत असून शनिवारी रात्रभर खंडित झालेला वीजपुरवठा रविवारीही दिवसभर सुरळीत झाला नव्हता.एमआयडीसी कार्यालयांतर्गत असलेल्या वीज ग्राहकांना या कार्यालयाच्या गलथान कारभाराचा मोठा फटका मागील चार महिन्यांपासून बसत आहे. दररोज या भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत कर्मचाºयांकडूनही ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने अबालवृद्धांची गैरसोय होत आहे.शुक्रवारी श्री गणरायाचे आगमन मोठ्या थाटात झाले. नवीन नांदेड भागात जवळपास दोनशेंहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. पहिल्याच दिवशी रात्री वीजपुरवठा खंडित झाला. तो कसाबसा रात्री उशिरा सुरू केला. दुसºया दिवशीही तोच कित्ता महावितरणने गिरवला.एमआयडीसी कार्यालयांतर्गत येणाºया वसरणी, दूध डेअरी, महसूल कॉलनी, शिवशंकरनगर, यशोधरानगर आदी भागात दररोज या ना त्या कारणाने वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरणकडून लोड जास्त झाल्याचे कारण दिले जात आहे. या भागातील वीज व्यवस्था सुधारण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले जात नाही. या भागात महावितरणने पावसाळापूर्व कामे केलीत की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भागातील रोहित्रही अतिशय धोकादायक अवस्थेत आहेत. त्याकडेही महावितरणने दुर्लक्ष केले आहे. वसरणी ते नावघाट पूल या दरम्यानचे विद्युत पोल कधीही कोसळतील, अशा अवस्थेत आहेत. याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही.