लातूर : शहर वाहतूक शाखेचे सपोनि. विठ्ठल खुणे विवेकानंद चौकात वाहन तपासणी करीत असताना कसलाही संबंध नसणाऱ्या एका व्यक्तीने हुज्जत करीत धमकी दिल्याप्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला. जोडजवळा येथील अविनाश बालाजी लोंढे (ह.मु. राजीव नगर, लातूर) या व्यक्तीने १४ जून रोजी सपोनि. खुणे यांच्यासोबत हुज्जत करीत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत कलम ३५३, ५०४, ५०६ भादंविनुसार अविनाश लोंढे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. दरम्यान, पोलिसांनी अविनाश लोंढे यास अटक केली होती़ सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका झाली़
वाहन तपासणीत अडथळा; गुन्हा दाखल
By admin | Updated: June 16, 2015 00:50 IST