शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे रखडल्या नेत्र शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:56 IST

महावितरणने सुरू केलेल्या वीज भरनियमनामुळे येथील नेत्र रुग्णालयातील रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे वेळापत्रक बिघडले असून, काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया चक्क रखडल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन भरनियमनाची वेळ बदलण्याची मागणी आता पुढे येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावितरणने सुरू केलेल्या वीज भरनियमनामुळे येथील नेत्र रुग्णालयातील रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे वेळापत्रक बिघडले असून, काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया चक्क रखडल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन भरनियमनाची वेळ बदलण्याची मागणी आता पुढे येत आहे.येथील शनिवार बाजार परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालयंतर्गत नेत्र रुग्णालय चालविले जाते. डोळ्याच्या नाजूक शस्त्रक्रिया या ठिकाणी होतात. मात्र महावितरणने दोन दिवसांपासून सुरू केलेल्या भरनियमनाचा परिणाम या रुग्णालयाच्या कामकाजावर तर झालाच आहे, शिवाय रुग्णांनाही फटका बसत असल्याची स्थिती आहे.महावितरणने सोमवारपासून विजेचे भारनियमन सुरू केले आहे. शनिवार बाजार परिसरात सकाळी ९.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भारनियमन केले जात आहे. त्यामुळे येथील नेत्र रुग्णालयातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. या रुग्णालयात दररोज सर्वसाधारणपणे मोतीबिंदूच्या १० शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णाची गुंतागुंत नसेल तर एका शस्त्रक्रियेला २० मिनिटांचा वेळ लागतो. रुग्णालयाच्या वेळापत्रकानुसार सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत बाह्य रुग्ण विभाग चालविला जातो. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे, अशा रुग्णांवर दुपारी अडीच वाजेपर्यंत शस्त्रक्रिया केल्या जातात.मंगळवारी नेत्र रुग्णालय परिसरात सकाळपासून भारनियमनाला सुरुवात झाली. ७ रुग्णांना मंगळवारी शस्त्रक्रियेसाठी बोलावले होते. मात्र सकाळपासून वीजप्रवाह खंडित असल्याने नियोजित वेळेनुसार शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे मंगळवारी केवळ ५ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या.बुधवारी देखील ही समस्या कायम होती. बुधवारी सकाळी ९.३० ते १.३० आणि सायंकाळी ३.३० ते ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा गुल झालेला होता. बुधवारी ९ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलावले होेते.मात्र वीजच नसल्याने एकाही रुग्णावर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. या रुग्णांच्या शस्त्रक्रिया एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केवळ वीज नसल्याने नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. वीजपुरवठ्याच्या वेळेनुसार आम्ही काम करीत आहोत. रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, या दृष्टीने प्रयत्न केले जातात. नियोजित वेळेशिवाय ज्या वेळेत वीजपुरवठा सुरू आहे, त्या वेळेत शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.