शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विभागाच्या पायरीवरच प्रसूती

By admin | Updated: June 16, 2017 00:59 IST

औरंगाबाद : स्ट्रेचर न मिळाल्याने घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी (दि. १५) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

मुजीब देवणीकर, संतोष हिरेमठ । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्ट्रेचर न मिळाल्याने घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी (दि. १५) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. स्ट्रेचर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी नसल्याचे म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले. स्ट्रेचर शोधण्यात वेळ गेल्याने शेवटी अपघात विभागासमोरच उघड्यावर महिलेची प्रसूती झाली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांत स्ट्रेचरवरून सुरू असलेला टोलवाटोलवीचा हा प्रसंग घाटीत उपस्थित ‘लोकमत’ प्रतिनिधीसमोरच घडला. चिकलठाणा परिसरातील एका गरोदर महिलेस मध्यरात्रीनंतर प्रसूती वेदना होऊ लागल्याने नातेवाइकांनी रिक्षातून पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास घाटीत आणले. रिक्षा अपघात विभागासमोर थांबविण्यात आली. रुग्णाला विभागात नेण्यासाठी नातेवाइकांनी स्ट्रेचरची शोधाशोध केली. अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. राहुल पांढरे यांच्याकडे नातेवाइकांनी स्ट्रेचरची मागणी केली. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. स्ट्रेचर देणे हे माझे काम नाही. रुग्णाला पाहण्यास मी बाहेर पण येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामध्ये १५ मिनिटे गेली. महिलेस प्रसूती वेदना असह्य झाल्या होत्या. नातेवाइकांनी तिला रिक्षातून बाहेर काढले. आतमध्ये नेत असताना अपघात विभागाच्या पायरीसमोरच ती खाली बसली. उघड्यावरच प्रसूती होणार असल्याची परिस्थिती लक्षात येताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली. चादरीचा आडोसा करण्यात आला. काही मिनिटांतच महिलेने गोंडस बाळास जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर सीएमओ डॉ. पांढरे आणि दोन परिचारिका धावत आल्या. परिस्थिती पाहिल्यानंतरही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.नागरिकांनी धावपळ करून स्ट्रेचर आणले; परंतु तोपर्यंत बराच वेळ झाला होता. शेवटी त्याच स्ट्रेचरवरून बाळ व बाळंतिणीस वॉर्डात दाखल करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर महिलेचे नातेवाइक माझ्याकडे आले. रिक्षातून उतरल्यानंतर (पान २ वर)