शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रास्तभाव परवान्यांच्या प्रक्रियेत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:25 IST

मागील महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली खरी़ मात्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्येच संदिग्धता असल्याने परभणीत ही प्रक्रिया सध्या थांबली आहे़ या संदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली खरी़ मात्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्येच संदिग्धता असल्याने परभणीत ही प्रक्रिया सध्या थांबली आहे़ या संदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य आणि रॉकेलचा पुरवठा करण्यासाठी पुरवठा विभागामार्फत रास्त भाव दुकान परवाना आणि केरोसीन परवाने दिले जातात़ काही कारणास्तव रास्तभाव दुकान परवाना रद्द झाला असेल अथवा परवाना धारकाने राजीनामा दिला असेल तर त्या जागी नवीन परवाने मंजूर करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले होते़ या आदेशानुसार आॅगस्ट महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यात नवीन रास्तभाव दुकान परवाने आणि किरकोळ केरोसीन परवाने देण्यासाठी जाहीरनामा प्रकाशित केला होता़ या जाहीरनाम्यानुसार संबंधितांकडून अर्जही मागविले होते़ जिल्ह्यात ४४ रेशन दुकानांसाठी अर्जांची मागणी करण्यात आली होती़ ही प्रक्रिया सुरू झाली़ परंतु, प्रक्रिया पूर्ण करताना अन्न नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या सुचनांमध्येच संदिग्धता असल्याने ती सध्या थांबली आहे़ शासनाच्या आदेशानुसार रास्तभाव दुकान किंवा किरकोळ केरोसीन परवाना देण्यापूर्वी परवाना प्राधिकाºयांनी आलेला प्रस्ताव महिला ग्रामसभेकडे पाठवून या ग्रामसभेच्या शिफारशीनंतरच मंजुरीबाबत अंतीम निर्णय घेण्याचे कळविले आहे़ परंतु, प्राधान्यक्रम आणि महिला ग्रामसभेची शिफारस यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे़ एकीकडे ग्रामपंचायतींना परवाना देण्यासाठी प्राधान्यक्रम दिल्याने महिला ग्रामपंचायतीची शिफारस घेण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ तसेच परवाना मंजूर करण्यासाठी दिलेल्या प्राधान्यक्रमात नोंदणीकृत स्वयंसहाय्यत बचत गटाला द्वितीय क्रमांकाचे प्राधान्य दिले आहे तर महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला पाचव्या क्रमांकाचे प्राधान्य दिले आहे़ असाच प्रकार नोंदणीकृत सहकारी संस्था आणि महिला सहकारी संस्था याबाबतही झाला आहे़ त्यामुळे प्राधान्यक्रम निवडताना वाद, संभम्र होण्याची शक्यता आहे़ तेव्हा या सर्व पार्श्वभूमीवर वरिष्ठ कार्यालयाने मार्गदर्शन करावे, अशी विनंती जिल्हा पुरवठा विभागाने केली असून, याच कारणास्तव परभणीतील रेशन दुकानांची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे़