शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

१000 घरकुलांचेच आले उद्दिष्ट

By admin | Updated: July 17, 2017 23:30 IST

हिंगोली : गेल्या वर्षीचे ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाही. कधी आॅनलाईनची अडचण तर काही लाभार्थ्यांना पुढील हप्तेच मिळाले नसल्याने कामे ठप्प आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या वर्षीचे ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झाले नाही. कधी आॅनलाईनची अडचण तर काही लाभार्थ्यांना पुढील हप्तेच मिळाले नसल्याने कामे ठप्प आहेत. भर पावसाळ्यात लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ येत आहे. हिंगोली जिल्ह्याला गतवर्षी तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असले तरीही आता ही सर्व प्रक्रिया आॅनलाइन झाल्याने तीच त्रासदायक ठरत आहे. पारदर्शकतेसाठी आणलेली ही प्रक्रिया लाभार्थ्यांना मात्र काहीच कळत नसल्याने अडचण झाली आहे. फोटो अपलोडच केले जात नसल्याने दुसऱ्या हप्त्याचे काम करूनही लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळाला नसल्याची उदाहरणे आहेत. तर अभियंतेही या नव्या झंझटीमुळे या कामांकडे कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच जुनी कामगिरी ठीकठाक नसल्याने यंदा केवळ हजार घरकुलांचेच उद्दिष्ट आले आहे. जिल्ह्यात जवळपास साडेसात हजार लाभार्थी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार आधीच जाहीर झाले आहेत. त्यानंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन यात बेघर व पात्र लाभार्थी देण्यास सांगितले होते. त्यात जवळपास २५ हजार जणांची नावे देण्यात आलेली आहेत. या लोकांचे नेमके काय होणार आहे, याचे अजून कोणीच काही सांगत नाही. त्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. त्यातच उद्दिष्टही कमी येत असल्याने २0२१ पर्यंत सर्व बेघरांना घरे देण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे.