शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका, सेवकांकडून रुग्णसेवा

By admin | Updated: May 17, 2017 00:26 IST

येडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़

लोकमत न्यूज नेटवर्कयेडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत परिचारिका व सेवकांनीच रुग्णांवर प्रथमोपचार केले़येडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ गावाचा समावेश आहे़ उपळा, कुमाळवाडी, आळणी ही उपकेंद्र आहेत़ तर जवळा उपकेंद्र सुरू होणार आहे़ कळंब तालुक्यातील ८ ते १० गावे येडशी जवळ असल्याने तेथील रुग्णही उपचारासाठी येडशी येथे येतात. राष्ट्रीय, राज्य मार्गावरील अपघातग्रस्तांना प्रथमोपचारासाठी येथेच आणले जाते़ प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ पदे मंजूर असून, तीन पदे रिक्त आहेत. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच कार्यरत आहेत़ डॉ़ झेड़ ए़ पटेल हे वैद्यकीय रजेवर आहेत़ सध्या ईटकूरचे डॉ़ वाघमोडे हे काम पहात आहेत़ आरोग्य सेविकाची २ पदे व आरोग्य सहायकाचे एक पद रिक्त आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर अंकूश नाही़ तर बायोमट्रीक मशीन बंद असून, ती सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत आहे़ गत काही दिवसापूर्वी पंस सदस्य संजय लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला होता़ त्यावेळी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही़ अनेकवेळा कर्मचारी वीज बंद करून गेटला कुलूप लावून झोपी जातात़ त्यामुळे दवाखाना सुरू आहे की बंद ? हेच रात्रीच्यावेळी समजत नाही़या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची सोमवारी रात्री ७ ते ११़३० या वेळेत पाहणी केली असता रुग्णांच्या गैरसोयीचे प्रकार समोर आले़ डॉक्टर नसल्याने आरोग्य सेविका पी़ए़पारडे व शिपाई पाडूरंग ठोकळे यांनीच येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले़ येडशी येथील जनार्दन दत्तू नागटिळक हे वयोवृद्ध नागरिक अचानक चालता येत नाही म्हणून तर शिवाजी पांडुरंग गाढवे (रा वडगाव ताक़ळंब) हे पायाला जखम झाल्याने उपचारासाठी आले होते़ तर आकाश तानाजी पवार (लमाण तांडा), विनायक शकंर धोगडे (रा वाघोली) राणी अभिमन्यू जाधव (रा जवळा) यांना छातीत दुखत असल्याने उपचारासाठी आणले होते़ महेश सूतार (रा़ शेलगाव ज.) व कमलेश निसार यांना गाडीवरून पडल्याने रात्री ११ वा उपचारासाठी आणण्यात आले होते़ या सर्वांवर कर्मचाऱ्यांनीच उपचार केले़ एखादा गंभीर आजाराचा किंवा अपघातासारखा प्रसंग ओढावला तर रात्री डॉक्टर नसतात़ त्यामुळे येथे कायम डॉक्टरांची नियुक्ती करणे आवश्यक आहे़