राजेश खराडे बीडजिल्ह्यात वन विभागाच्या ५ नर्सरी असून, रोपवाटिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या विद्युत पंपांची उभारणी करण्याचा संकल्प विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांनी केला आहे. त्याकरिता पिंपळवंडी, सौताडा (ता. पाटोदा) येथील सौरपंपावरील यंत्रणा सुरू झाली असून, सुलभरीत्या पाणीपुरवठा होत आहे. सद्य:स्थितीत मुबलक पाणी असले तरी भविष्याचा विचार करून मराठवाड्यात हा पहिला अनोखा प्रयोग राहणार आहे.जिल्ह्यात सौताडा, पिंपळवंडी, खासबाग, अंबाजोगाई, परळी, तसेच धारूर तालुक्यातील धुनकवड येथे वन विभागाच्या नर्सरी आहेत. सौरऊर्जेवरच निर्मिती करून बोअरवेलवरील विद्युत पंपांच्या साहायाने पिंपळवंडी येथील रोपवाटिका जगविली जात आहे. देखभाल, दुरुस्तीकरिता ही पद्धती कमी खर्चाची आहे. केवळ २ लाख रुपये खर्चून पिंपळवंडी नर्सरीवर सौरपंपाद्वारे वीज निर्मितीची संकल्पना साकार करण्यात आली आहे.आगामी वर्षात १२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, त्या दृष्टीनेच पायाभूत तयारी येथील विभागीय वन अधिकाऱ्यांनी केली आहे. उर्वरित नर्सरींवरही देखील सौरपंप उभारून प्रत्येक नर्सरीस ४ लाख रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट वन विभागाकडून दिले जाणार आहे.
वन विभागाच्या नर्सरी सौरऊर्जेवर
By admin | Updated: November 11, 2016 00:17 IST