शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले

By admin | Updated: June 22, 2015 00:18 IST

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात दिवसाढवळ्या वन्य प्राण्याची हत्या केली जात आहे. तसेच या प्राण्यांचे मांस ग्राहकांना घरपोच देत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात दिवसाढवळ्या वन्य प्राण्याची हत्या केली जात आहे. तसेच या प्राण्यांचे मांस ग्राहकांना घरपोच देत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र, याबाबत वनविभाग अनभिज्ञ असून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होताना दिसत आहे.तालुक्यातील पिंपळगाव परिसर हा दाट जंगलवस्तीचा परिसर आहे. यावर आता पावसाळ्याच्या तोंडावर वन्यप्राणी या जंगलात वास्तव्य करीत असतात. यामध्ये हरिण, रानडुकर, तितर, घोरपड, ससे, मोर आदी प्राणी या वन विभागात वावरत असतात. मात्र या परिसरात शिकारी वर्गाने डोके वर काढले असून हे शिकारी दिवसाढवळ्या या प्राण्यांना जाळ्यात अडकवून त्यांची शिकार करीत आहेत. शिकारी फक्त शिकारच करीत नाहीत, तर त्या प्राण्याची इतर भागात विक्री देखील करु लागले आहेत. दिवसेंदिवस मांस विक्रीची संख्या वाढत चालली आहे. ज्या प्राण्याची शिकार करण्यात येते, त्याची माहिती गावातील एजंटमार्फत ग्राहकांना देण्यात येते. तसेच मारलेल्या प्राण्याचे मांस गावात मोबाईलद्वारे संपर्क करुन घरपोच डिलेव्हरी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. प्राण्यांच्या मांस विक्रीतून अनेकांना पैसे कमावण्याचे साधन निर्माण झाले आहे. पिंपळगाव रेणुकाई, पारध, रेलगाव, कोठा कोळी आदी भागात वन्यप्राण्यांच्या शिकारी जर अशाच चालू राहिल्या तर या भागातील वन्य प्राण्याची संख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे. याकडे वनविभागाने लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, गत काही वर्षात परिसरात वृक्षतोडी तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत आहे. या प्रकाराकडे तहसील तसेच वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांची शिकार थांबवावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे. (वार्ताहर)