शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची संख्या ४०० वर

By admin | Updated: May 4, 2016 00:31 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी तब्बल ३७९ टँकरना मंजुरी दिली आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी तब्बल ३७९ टँकरना मंजुरी दिली आहे़ तर ३४७ गावे आणि टँकरसाठी २४७ अशी एकूण १३२६ विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, शहरी भागातील नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे़ टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायत स्तरावरून येणाऱ्या प्रस्तावांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे़ सध्या जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी ३७९ टँकरना मंजुरी देण्यात आली आहे़ यात उस्मानाबाद तालुक्यातील ४० गावांसाठी ७८ टँकर, तुळजापूर तालुक्यातील २३ गावांसाठी ३५ टँकर, उमरगा तालुक्यातील ३० गावांसाठी ५४ टँकर, लोहारा तालुक्यातील ७ गावांसाठी २० टँकर, कळंब तालुक्यातील ४० गावांसाठी ५३ टँकर, भूम तालुक्यातील ५३ गावांसाठी ५८ टँकर, वाशी तालुक्यातील २५ गावांसाठी ३१ टँकर तर परंडा तालुक्यातील २८ गावांसाठी ३० टँकर सुरू करण्यात आले आहेत़यात उस्मानाबाद तालुक्यातील विठ्ठलवाडी, बुकनवाडी, कनगरा, तोरंबा, मुळेवाडी, सकणेवाडी, कोलेगाव, कौडगाव बावी, रूईढोकी, जवळे दुमाला, रूईभर, उंबरेगव्हाण, नांदुर्गा, बोरखेडा, इर्ला, आंबेवाडी, दूधगाव, खामगाव, गडदेवधरी, डकवाडी, कोळेवाडी, कामेगाव, वाणेवाडी, बामणीवाडी येथे प्रत्येकी एक, पाडोळी, पाटोदा, केशेगाव, मेंंढा, काजळा, टाकळी बेंबळी, वडगाव सिध्देश्वर येथे प्रत्येकी दोन, करजखेडा, तेर, सांजा येथे प्रत्येकी तीन, पळसप येथे चार, येडशी, कसबेतडवळे, बेंबळी येथे प्रत्येकी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़ तुळजापूर तालुक्यातील अणदूर- पुजारी तांडा, ढेकरी, भातंब्री, बिजनवाडी, चिंचोली, मसला खुर्द, खानापूर, चिवरी, वडगाव काटी, आरळी खुर्द, आलियाबाद, सांगवी मा़ वडगाव ला़ येथे प्रत्येकी एक, कसई, खुदावाडी तांडा, होर्टी, जळकोट, किलज येथे प्रत्येकी दोन, सलगरा दिवटी, आपसिंगा येथे प्रत्येकी तीन तर मंगरूळ येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़उमरगा तालुक्यातील मातोळा, नारंगवाडी प़ कोळसूर के़ बाभळसूर, हिप्परगावाडी, काळनिंबाळा, कोरेगाव, मळगी, भिकार सांगवी, कोरेगाववाडी, जकेकूरवाडी, कोळसूर (गु़), गणेशनगर, नाईकनगर (एक), नाईकनगर (सु़), त्रिकोळी, सावळसूर आदी गावात प्रत्येकी एक, चिंचोली ज, नारंगवाडी पू़ कडदोरा, कवठा, कसगी, आनंदनगर, माडज, कलदेव निंबाळा, डिग्गी येथे प्रत्येकी दोन, औराद, बेळंब, येणेगूर, पेठसांगवी, बलसूर येथे प्रत्येकी तीन टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ या शिवाय लोहारा, कळंब, भूम, वाशी व परंडा तालुक्यातील गावा-गावांनाही टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ (प्रतिनिधी) टँकरसाठी ३३८ अधिग्रहणेजिल्ह्यातील २४६ गावांसाठी ३७९ टँकर सुरू आहेत़ हे टँकर भरण्यासाठी ३३८ विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ याशिवाय ३४७ गावांसाठी ९८८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ या कूपनलिकांवरून गावा-गावांतील ग्रामस्थ पाणी भरत आहेत़ टँकर भरण्यासाठी आणि गावा-गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल १३२६ विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़१३७ खेपा कमीजिल्ह्यातील २४६ गावांसाठी ३७९ टँकर सुरू आहेत़ या टँकरच्या ७७४० खेपा मंजूर आहेत़ मात्र, एप्रिल अखेरच्या अहवालानुसार मंजूर ७७४० खेपांपैकी केवळ ६००५ खेपा झाल्या असून, यात १७३५ खेपा या कमी झाल्याची नोंद आहे़ केवळ खंडित वीजपुरवठा आणि दूरवरील अधीग्रहण यामुळे या टँकरच्या खेपा कमी होताना दिसत आहेत़