लातूर : तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा तर रबी हंगाम शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. त्यामुळे शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली आहे. आवक वाढलेली असतानाही दर चांगला मिळत असल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. शनिवारी सर्वसाधारण दर ४७०० रुपये प्रति क्विंटल असा राहिला. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. त्यामुळे खरीप हंगामातील काही पिकांना बाधा पोहोचली होती. मात्र अतिपावसाचा लाभ यंदाच्या रबी हंगामासाठी झाला आहे. गेल्या तीन वर्षांत अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांना रबी हंगाम घेता आला नाही. ज्या शेतकऱ्यांनी अल्प पाण्यावर रबीचा पेरा केला होता, त्यांच्या पदरी पेरणीसाठीचा खर्चही पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. जिल्ह्यात यंदा रबी हंगामातील हरभऱ्याचा पेरा २ लाख ९ हजार हेक्टरवर (अधिक वृत्त हॅलो/२ वर)
हरभऱ्याची आवक वाढली; दरही चांगला
By admin | Updated: March 6, 2017 00:48 IST