शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या पुन्हा शंभरावर; धोका वाढतोय; काळजी हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा शंभरावर गेली. दिवसभरात ११५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे कोरोनाचा धोका ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा शंभरावर गेली. दिवसभरात ११५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे कोरोनाचा धोका संपलेला नसून काळजी हवीच, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. गुरुवारी शहरात २६, तर ग्रामीण भागात ८९ नवे रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत होती. परंतु गुरुवारी त्यात बरीच वाढ झाली. जिल्ह्यात सध्या ९०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ७८१ एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार ४७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ८०, अशा १०० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना गारखेडा परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, शेवता, पैठण येथील ४० वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ८१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद १, जुना बाजार १, मोंढा नाका १, सिंधी कॉलनी १, एन-५ येथे १, लालबाग १, पुंडलिकनगर १, पद्मपुरा १, चिकलठाणा ३, छावणी १, एन-१२ येथे १, डीकेएमएम हॉस्पिटल २, टी. व्ही. सेंटर १, भगतसिंगनगर १, रेल्वेस्टेशन १, शिवाजीनगर १, अन्य ७

ग्रामीण भागांतील रुग्ण

रांजणगाव ४, शेवगाव १, पिंपळगाव, ता. सिल्लोड १, यशवंतनगर, ता. पैठण १, एन-९ येथे १, पैठण २, अन्य ७९