शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधणीत लाखाचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:20 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणंदमुक्ती अभियानात बीड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली असून, सहा महिन्यांच्या कालावधीत शौचालय उभारण्याचा १ लाखाचा आकडा पार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणंदमुक्ती अभियानात बीड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली असून, सहा महिन्यांच्या कालावधीत शौचालय उभारण्याचा १ लाखाचा आकडा पार केला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४२६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. त्याचबरोबर राज्याच्या रँकमध्ये बीड जिल्ह्याने मोठी उडी घेत २३ वा क्रमांक प्राप्त केला.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात पाणंदमुक्तीची चळवळ अधिक बळकट झाली आहे. दोन वर्षांआधी बीड जिल्हा शौचालय उभारणीत पिछाडीवर होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी या अभियानात झोकून दिले. पहाटे गावांमध्ये सायकल फेरी काढून तर कधी ‘गुड मॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून लोटाबहाद्दरांमध्ये धडकी भरवून उघड्यावर शौचास जाण्यास परावृत्त केले. त्यानंतर विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला यांनीही या मोहिमेत लक्ष घातले आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधत ही मोहीम जोरदारपणे सुरू ठेवली. तालुका आणि जिल्हा पातळीवरील ६०० कर्मचा-यांचा ताफा ६५ पथकांमध्ये विभागून गुड मॉर्निंग सुरू केले. यातून लोकजागृती करीत आरोग्याचे महत्व पटवून दिले. जनतेतूनही प्रतिसाद मिळाला. स्वच्छताप्रेमी जनतेच्या मदतीने स्वच्छतेची दिवाळी साजरी केल्यानंतर आॅक्टोबरमध्ये जिल्ह्याने विक्रम केला. २ महिन्यांत उर्वरित उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक म्हणाले.