शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारदारांची संख्या वाढणार

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोकांना दुप्प्पट-तिप्पट रकमेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची संख्या आणखी वाढली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोकांना दुप्प्पट-तिप्पट रकमेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची संख्या आणखी वाढली आहे. दरम्यान, ‘सुपर पॉवर इनव्हेस्टमेंट सेव्हिंग इंडिया प्रा.लि. कंपनी’ चे चार एजंट फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक पाठविण्यात आले तरी आरोपी अजून सापडलेले नाहीत.मागील २ वर्षापासून अनेकांना ‘सुपर पॉवर’ कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी विविध बनावट योजना सांगून त्यांना दुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून भरमसाठ पैसे गुंतवण्यास भाग पाडले. ही रक्कम जमा करून कंपनीचे बनावट व्हाऊचर व बँकेचे खोटे धनादेश देऊन लाखो रूपयांचंी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत औंढा तालुक्यातील लाख येथील ८ जणांनी आपली सदर कंपनीकडून फसवणूक झाल्याची पोलिसांत तक्रार दिली आहे. लाख येथील विश्वनाथ दादाराव लोंढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश रामभाऊ शिंदे (रा.लाख), दीपक केडू पारखे, दिव्या दीपक पारखे (दोघे रा.औरंगाबाद), विश्वनाथ बोचरे (रा.खरबी), संपत केदारलिंग वसू (रा.इंचा), नामदेव तुकाराम कऱ्हाळे (रा.डिग्रस कऱ्हाळे) यांच्याविरूध्द सहा दिवसांपुर्वीच बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुपर पॉवर इनव्हेस्टमेंट सेव्हिंग इंडिया प्रा.लि.चे संचालक असलेले दीपक पारखे, दिव्या पारखे यांना औरंगाबाद येथे यापुर्वीच अटक झाली आहे. त्यानंतर एजंट प्रकाश शिंदे, विश्वनाथ बोचरे, संपत वसू, नामदेव कऱ्हाळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय शिरडशहापूर, आखाडा बाळापूर परिसरातही या कंपनीने अनेकांना गंडविल्याचे समोर येत आहे. बाळापूर येथील एका वकिलही या कंपनीच्या जाळ्यात अडकला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे आर्थिक गुंतवणूक करून फसवल्या गेलेले अनेकजण दररोज पोलिसांकडे चकरा मारत आहेत. या संदर्भात बासंबा ठाण्याचे सपोनि सुधाकर आडे यांना विचारले असता, सुपर पॉवर कंपनीकडून अनेक जणांची फसवणूक झाली आहे. तशा तक्रारी जिल्हाभरातून येत असून त्याबाबतची कागदपत्रे पडताळून तक्रारी स्विकारल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)फरार आरोपी पोलिसांना सापडेनात