शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

...आता कुलसचिव शोधावे लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी १४ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. राज्य सरकारकडून हा कालावधी वाढवून मिळण्याची शक्यता नसल्यामुळे डॉ. जब्दे हे शुक्रवारीच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील मूळ पदावर रुजू होणार असल्याचे समजते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी १४ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. राज्य सरकारकडून हा कालावधी वाढवून मिळण्याची शक्यता नसल्यामुळे डॉ. जब्दे हे शुक्रवारीच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील मूळ पदावर रुजू होणार असल्याचे समजते. यामुळे परीक्षा संचालकाप्रमाणे कुलगुरूंना प्रभारी कुलसचिवपदासाठी व्यक्ती शोधावी लागणार आहे.विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूंनी प्रचलित नियमांनुसार कुलसचिवांची नेमणूक न करता डॉ. प्रदीप जब्दे यांना विद्यापीठ फंडातून वेतन दिले आहे. या दिलेल्या वेतनाविषयी राज्य सरकारने कडक शब्दांत ताशेरेही ओढले आहेत. याचवेळी डॉ. जब्दे यांची म.शि.प्र. मंडळाच्या गंगापूर येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर सहा महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती केली होती. ही मुदत १४ नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र, शनिवार, रविवारी सुट्या आल्यामुळे कुलसचिवांनी शुक्रवारीच मंडळात रुजू होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या निवडणूक विभागात काम करणाºया कर्मचा-यांना डॉ. जब्दे यांनी तशा पद्धतीच्या सूचनाही दिल्याचे समजते. पेंडिंग असलेली कामे पूर्ण करून घ्या, शुक्रवारी मी असेनच असे नाही. या शब्दांत सर्व कामे उरकून घेण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयी मंडळात चौकशी केली असता, डॉ. जब्दे हे रुजू होणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. मात्र, ते शुक्रवारी रुजू होणार, की सोमवारी याविषयी मतभिन्नता असल्याचे समजते. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या मुदतीच्या आतच मूळ पदावर रुजू होण्यास डॉ. जब्दे यांनी प्राधान्य दिले आहे.प्रतिनियुक्ती देण्यापूर्वी सेवासातत्य खंडित झाले आहे. याविषयीचे ताशेरे सरकारने ओढले असल्यामुळे पुन्हा तीच चूक होऊ नये, याची खबरदारी डॉ. जब्दे घेत असल्याचे समजते.