शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आता मिटली वेतनाची चिंता

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

विजय सरवदे ,औरंगाबाद थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा करणारी ‘कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट’(सीएमपी) ही नवीन संगणकीय वेतन प्रणाली जिल्हा परिषदेने स्वीकारली असून

विजय सरवदे ,औरंगाबादथेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा करणारी ‘कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट’(सीएमपी) ही नवीन संगणकीय वेतन प्रणाली जिल्हा परिषदेने स्वीकारली असून, पुढील महिन्यापासून जि.प., पंचायत समित्यांमध्ये कार्यरत ३ हजार ८०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन या नवीन वेतन प्रणालीनुसार अदा केले जाणार आहे. वित्त मंत्रालयाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ‘सीएमपी’ ही नवीन वेतन प्रणाली अमलात आणणे बंधनकारक केले आहे. या वेतन प्रणालीनुसार नोव्हेंबर महिन्याचे वेतन डिसेंबरच्या १ तारखेपासून थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेने मागील ४-५ महिन्यांपासूनच ही वेतन प्रणाली स्वीकारली असून जि.प. वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रशिक्षण घेऊन यावर काम सुरू केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन हे गेल्या दोन वर्षांपासून पंचायतराज सेवार्थ प्रणालीद्वारे केले जात असे. दरम्यान, या प्रणालीच्या माध्यमातूनही कर्मचाऱ्यांच्या हातात वेतन पडेपर्यंत प्रशासनाला बऱ्याच प्रक्रिया पार पाडाव्या लागत आहेत.विनाविलंब कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले पाहिजे, यासाठी ग्रामविकास व वित्त मंत्रालयाची आग्रही भूमिका आहे. त्याकरिता शासनाने आता ‘सीएमपी’ ही नवीन वेतन प्रणाली स्वीकारली असून याद्वारे आता थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा होणार आहे.