शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आता मालधक्क्यावर दोन फेऱ्यांमध्ये काम

By admin | Updated: June 17, 2014 01:15 IST

जालना : येथील रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर रॅकमधून खताचा माल उतरविण्यास लागणाऱ्या विलंबाचा प्रश्न जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या मध्यस्थीमुळे निकाली निघाला आहे

जालना : येथील रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर रॅकमधून खताचा माल उतरविण्यास लागणाऱ्या विलंबाचा प्रश्न जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या मध्यस्थीमुळे निकाली निघाला आहे. अतिरिक्त कामगारांची नोंदणी करून दोन फेऱ्यांमध्ये कामगारांकडून काम करवून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार अधिकाऱ्यांना दिले आहेत.जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. मालधक्क्यावर सद्यस्थितीत सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत कामकाज चालते. कामगार केवळ याच वेळेत माल उतरवितात. रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे रॅक आल्यापासून ९ तासात माल उतरणे आवश्यक आहे. त्यापुढे प्रतितास १० हजार रुपये डेमरेज दर आकारले जातात. रेल्वे रॅक दुपारपर्यंत आल्यास माल उतरविण्यास दुसरा दिवस उजाडला जातो. परिणामी, मोठ्या प्रमाणात डेमरेजची रक्कम वाहतूक प्रतिनिधींना भरावी लागते. या अडचणीचा फटका खरीप हंगामात खताचा माल उतरविण्यास होत असे. माल विलंबाने उतरला आणि त्यास डेमरेज द्यावा लागल्यास खताचा माल शेवटपर्यंत निर्धारित किमतीत पोहोचत नव्हता. मात्र जिल्हाधिकारी नायक यांनी कामगार निरीक्षकांना अतिरिक्त कामगार नोंदणी करून खताचा माल उतरविण्याचे काम सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते रात्री ११ अशा दोन फेऱ्यांमध्ये कामगारांनी काम करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)१३०० मे.टन खत आलेरेल्वे विभागाने रॅकपॉईन्टवरील डेमरेजचे दर १ जूनपासून वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु माल उत्पादक कंपन्यांनी सर्वदूर बंद घोषित केल्याने तब्बल १३ दिवस जालना मालधक्क्यावरील वाहतूक बंद होती. परंतु डेमरेज दरवाढीच्या निर्णयास रेल्वे प्रशासनाने स्थगिती दिल्याने कंपन्यांनी बंद मागे घेतला. त्यामुळे १६ जून रोजी आरसीएफ खताचा १३०० मे.टन माल सोमवारी उतरविण्यात आला. ‘पेट्रोमॅक्स, लाईटची व्यवस्था करा’रेल्वे मालधक्क्यावर खताचा माल भरताना कामगारांसाठी पेट्रोमॅक्स व प्लॅटफार्मवरील लाईटची सोय वाहतूक प्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाने करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खताचा पुढील रॅक येण्याअगोदर ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.