हिंगोली : आधार संलग्निकरण आता रॉकेल लाभार्थ्यांसाठीही बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांनी आधार क्रमांक दिला नाही, अशांचे रॉकेल ३१ जानेवार २0१७ पासून रोखून धरण्याचा आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिला आहे.यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व लाभार्थ्यांचे आधार संलग्नीकरण केल्याशिवाय त्या लाभार्थ्यांना धान्यपुरवठा करू नये, असा आदेश दिला होता. त्यानंतर त्यात काही प्रमाणात शिथिलता दिली होती. मात्र आता रॉकेलसाठी कठोर आदेश दिला आहे. याशिवाय लाभार्थ्यांपैकी कुटुंबप्रमुख अथवा कोणत्याही एका सदस्याचा भ्रमणध्वनी क्रमांक आवश्यक आहे. ३0 आॅक्टोबरपर्यंत हे सर्व द्यावयाचे असून १ नोव्हेंबरनंतर रॉकेल कोटा रोखून धरण्यास आदेशित केले आहे. तर ३१ जानेवारीपर्यंत आधार संलग्निकरण न केल्यास कोटा व्यपगत केला जाणार आहे. त्यामुळे आता रॉकेल विक्रेत्यांना आधारसाठी कामाला लागावे लागणार आहे. ज्या गोरगरिबांना रॉकेलची नितांत गरज आहे, त्यांनी आधार लिंकिंगकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा आधारसाठी गडबड सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
आधारशिवाय आता रॉकेल मिळणार नाही
By admin | Updated: October 15, 2016 01:15 IST