शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आता वॉर्डनिहाय जाहीरनामाही लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:43 IST

महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेड महापालिकेत महापौरपदी काँग्रेसच्या शीलाताई भवरे व उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाल्यानंतर खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत या दोन्ही पदाधिकाºयांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर शहरातील विकासकामासंदर्भात खा. चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातीलच. इतकेच नव्हे, तर मी स्वत: एखाद्या प्रभागास भेट देवून तेथील समस्यांची माहिती घेणार आहे.त्यानंतर याच पद्धतीने संपूर्ण वॉर्डा-वॉर्डातील समस्या जाणून घेतल्या जातील. त्या सोडवण्यासाठी वॉर्डनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करुन प्रश्न सोडविण्याचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. शहराचा पाच वर्षांचा विकास आराखडाही तयार केला जाईल. यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. काँग्रेसने जनतेपुढे ठेवलेला जाहीरनामाही प्रशासनाकडे दिला आहे. ती कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील कचरा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्याची गरज आहे.आजघडीला तांत्रिक अडचणीमुळे हा विषय प्रलंबित असला तरी तो लवकरच सोडविला जाईल. महापालिकेची परिस्थिती बिकट असली तरीही तिजोरीत खडखडाट नाही. फक्त आर्थिक नियोजनाची गरज असल्याचे खा. चव्हाण म्हणाले. महापालिकेचे आर्थिक स्त्रोत बळकट करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचाही आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहर हद्दवाढीच्या विषयात नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. मात्र शाश्वत विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. यासाठी त्या त्या भागातील नागरिकांचे तसेच माध्यमांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढीतून मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावरही काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले.