शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता वर्कआॅर्डरची प्रतीक्षा!

By admin | Updated: June 23, 2014 00:26 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशातून येणारे पाणी शुद्धीकरण करणारे एक युनिट गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशातून येणारे पाणी शुद्धीकरण करणारे एक युनिट गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले. त्यानंतर नगर पालिका व जिल्हा प्रशासनाने या बंद युनिटच्या दुरूस्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या युनिटच्या दुरूस्तीसाठी पालिका प्रशासनाने २९ लाखांच्या कामाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.जालना शहराला घाणेवाडी जलाशय आणि जायकवाडी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी विशेषत: नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा केला जात आहे. घाणेवाडी जलाशयातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येते. तेथे शुद्धीकरण झाल्यानंतर पुरवठा करण्यात येतो. याठिकाणी दोन जलशुद्धीकरण करण्याचे युनिट आहेत. त्यापैकी एक युनिट तब्बल पाच वर्षापासून बंद आहे. एकाच युनिटवरून जलशुद्धीकरण होत असल्यामुळे नवीन जालना भागात पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या. या संबंधी लोकमतने २७ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने या बाबीची गंभीरपणे दखल घेतली. पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. नादुरूस्त असलेले युनिट सुरू करण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार केले. सुमारे ४५ लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यात जलशुध्दीकरणाच्या बंद युनिटसाठी २९ लाख रूपये तर घाणेवाडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत असलेल्या जलवाहिनी दुरूस्तीसाठी दहा लाख रूपये असा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली असून लवकरच जलशुध्दीकरण केंद्राची दुरूस्ती करण्यासाठी वर्कआॅर्डर काढणे, एजन्सी नियुक्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)अनेक भागांत अशुद्ध पाणीपुरवठाजलशुद्धीकरण केंद्रातून नवीन जालना भागाला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जलशुद्धीकरण केंद्रातील बंद युनिटचे काम होणे गरजेचे आहे. आता त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने हे काम लकवरच होईल. त्यामुळे नागरिकांची पिवळसर पाण्यापासून सुटका मिळेल, अशी आशा जालनेकर बाळगून आहेत.जलशुध्दीकरण केंद्राच्या एक बंद युनिटच्या कामासाठी २९ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या कामाचे आता वर्कआॅर्डर बाकी आहे. वर्कआॅर्डर मिळताच संबंधित एजन्सीमार्फत हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली.