शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:35 IST

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे.

ठळक मुद्दे११ तास चालणार मतदान प्रक्रिया : उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरू नये, यासाठी घेतला निर्णय

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे. या वेळेत मतदान केंद्रांवर मतदारांना सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले.मतदान प्रक्रियेसाठी पूर्वी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान घेण्यात येत होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी आयोगाने वेळ बदलली आहे. उन्हामुळे दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का घसरतो. त्यामुळे सकाळी अर्धा तास आणि सायंकाळच्या टप्प्यात एक तास वाढविण्यात आला आहे.आयोगाने मतदानाच्या वेळात दीड तास वाढ केल्याने निश्चितच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. उन्हाचा पारा चढत असल्यामुळे मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आल्याचे दिसते. प्रशासन तांत्रिक कारणे सांगत असले तरी उन्हामुळे मतदान कमी होऊ नये, यासाठीच आयोगाने वेळ वाढविल्याचे स्पष्ट होते.१२२ मतदान केंद्रांचे स्थलांतरप्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी शेडस् करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक उपचाराच्या सुविधेसह चार मतदान केंद्रांसाठी एक आरोग्य पथक तैनात असेल. जिल्ह्यात तीन हजारांच्या आसपास मतदान केंद्रे आहेत. १२२ ठिकाणच्या इमारती जीर्ण असल्यामुळे त्यांची कामे सुरू असल्याने ती इतरत्र स्थलांतरित करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रींगी यांनी सांगितले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान