- टेलरचे काम होणार आणखी सोपे- नव्या तंत्रज्ञानाला बाजारात मोठी मागणीऔरंगाबाद, दि.२ - संगणकाच्या वापराने अनेक कामे सोपी झाल्याचे आपण म्हणतो; पण काही गोष्टीचा पर्याय आतापर्यंत सापडला नव्हताच. काही क्षेत्रात आजही संपूर्ण काम मानवी कौशल्याशिवाय पूर्ण होत नव्हते़ यात टेलरिंग उद्योगाचा समावेश होता. गाव, खेड्यापासून ते प्रोफेशनल टेलर्स म्हणून ख्यातनाम असलेले ब्रँड्सदेखील मशीन्सकडून काम न करता कामगारांकडून काम करवून घेत होते; परंतु आता जगात विकेंद्रित व्यवसाय म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या या व्यवसायात सॉफ्टवेअरचा प्रवेश झाला आहे. इथून पुढच्या काळात सॉफ्टवेअरच कपड्यांची निर्मिती करणार आहे. या तंत्रामुळे टेलरचे काम खूपच सोपे होणार असून या तंत्राला बाजारात मोठी मागणी आहे़ फॅ शन जगत कधीही स्थिर उद्योग मानला गेला नाही. यात बदल होत राहिले; मात्र एक काम कायम सुरू होते ते म्हणजे कापड तयार करण्यासाठी कुशल कामगार. बदलत्या काळानुरूप मशिन्समध्ये बदल झाला. त्याचा उपयोगही वाढत गेला; मात्र कामगारांची जागा स्थिर होती. आता शिवणकाम करणार्यांच्या सुई, इंचटेप, कैची या वस्तू कालबाह्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ कारण घालण्यासाठी लागणार्या सर्व वस्त्रांची निर्मिती कॉम्प्युटरच्या माध्यमातून मशिनीद्वारे करण्यात येणार आहे. फॅशनच्या दुनियेत कॉम्प्युटरचा वापर वाढत चालला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आता कापड डिजायनिंगची दिशा बदलत चालली आहे. कापडाची कटिंग कशी करायची, हेही आता संगणकच सांगणार आहे़ वस्त्रांच्या डिझाईन्समध्ये बदलजर तुम्हाला कपडे शिवून घालायचे असतील, तर अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. यात डिझाईन, कट, शरीरावर फिट होण्याची पद्धती याचा अंदाज घेणे आवश्यक ठरते़ आता असे सॉफ्टवेअर्स आले आहेत की, ज्यांच्या मदतीने आपण शिवत असलेल्या कापडांचे कॉम्प्युटर स्क्रिनवर शिवल्यानंतर ते कसे दिसतील हे पाहता येईल़ वस्त्र निर्माते या तंत्राचा वापर करीत आहेत. यामुळे त्यांना दरवेळी वस्त्रांच्या डिजाईन्समध्ये बदल करणे सोपे जात आहे. यामुळे त्यांचा उत्साह वाढला तर आहेच, शिवाय नवे डिजाईन्स तयार करताना त्यांना जास्त मेहनत करण्याची गरजही राहिलेली नाही.
आता सॉफ्टवेअर शिकवेल शिवणकाम
By admin | Updated: May 3, 2014 14:34 IST