शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आता खड्ड्यांचेही होणार सर्वेक्षण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:20 IST

महापालिकेच्या हद्दीत १४०० किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर नेमके किती खड्डे आहेत, याचीच माहिती मनपाकडे नाही. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण अत्याधुनिक पद्धतीने करून देण्यासाठी एक खाजगी संस्था सरसावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीत १४०० किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर नेमके किती खड्डे आहेत, याचीच माहिती मनपाकडे नाही. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण अत्याधुनिक पद्धतीने करून देण्यासाठी एक खाजगी संस्था सरसावली आहे. महापालिका या संस्थेच्या सहकार्याने खड्ड्यांची डाटा बँक तयार करणार असून, त्यानंतर संस्थेने दिलेल्या सूचनेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजविण्यात येतील. या कामामुळे मनपाच्या खर्चात आणखी बचत होणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे.शहरातील उद्योजक रणजित देशमुख यांनी ‘रोड बाऊन्स’ ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था रस्त्यांचे जिओ टॅगिंगने मॅपिंग करून देते. आंतरराष्टÑीय पातळीवरही संस्था हे काम करते. रस्त्यांचे सर्वेक्षण करून अपघात स्थळ, मोठे खड्डे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ५० हजार कि.मी. रस्त्याचे सर्वेक्षण करून घेतलेआहे.महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, शहरात दीडशे कोटींचे रस्ते तयार केले जाणार आहेत. हे रस्ते वगळून उर्वरित सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण संस्थेकडून केले जाणार आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सर्वेक्षण होणार आहे. कोणत्या रस्त्यावर किती वाहतुकीची वर्दळ आहे. खड्ड्यांची वर्गवारी करण्यात येईल. कोणत्या खड्ड्याला कशा पद्धतीने बुजवावे याचे गणितही संस्था मांडून देणार आहे. सर्वेक्षण तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत केले जाते.