शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता बाजार समितीचा कारभार आॅनलाईन...!

By admin | Updated: March 4, 2017 00:22 IST

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आता पूर्णपणे आॅनलाईन होणार असून, संपूर्ण कार्यालयाची पेपरलेस होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आता पूर्णपणे आॅनलाईन होणार असून, संपूर्ण कार्यालयाची पेपरलेस होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत मंडी आॅनलाईनवर सर्व अपडेटस शेतकऱ्यांसह नागरिकांना मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल दिवसेंदिवस वाढतच आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कामकाज अधिकाधिक संगणकीय व्हावे, या दृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्न असून, त्याच दिशेने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल सुरू झाली आहे. बाजार समितीतील सर्व माहिती व शेतमालाचे दर या संकेतस्थळावर झळकणार आहेत. त्यामुळे एका क्लिकवर याबाबतची माहिती जगभरात कुठेही बसून मिळू शकणार आहे. यासाठी राज्य शासनाने बाजार समिती प्रशासनाला जवळपास २ कोटी रुपये खर्चाचे हार्डवेअर आणि एक कोटी रुपये खर्चाचे सॉफटवेअर देण्यात येणार आहे. याबाबतचे कामकाज सुरु झाले असून, येत्या काही दिवसांत ते पूर्णत्वास जाईल, असा विश्वास समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार या संकेतस्थळावर जालना जिल्ह्यातील शेतमालाचे भावही आॅनलाईन दिसू शकणार आहेत. आतापर्यंत बाजार समितीच्या कार्यालयात विविध विभागांत पावती बुक यासह विविध प्रकारचे दस्तावेज पडलेले दिसत असत. संगणकीकरणानंतर हे कार्यालय पेपरलेस होणार आहे. तसेच कारभारातही सुसूत्रता व पारदर्शकता येणार आहे. आॅनलाईन सेवेमुळे कुठलीही माहिती शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.