शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आता जनता भाजपाला करणार बाय-बाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:40 IST

विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़प्रभाग ५ व १९ मधील काँगे्रस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर आ.डी.पी.सावंत, प्रवक्ते अतुल लोंढे, नरेंद्र चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग, सभापती माधवराव मिसाळे, सुखदेव जाधव, अ‍ॅड.निलेश पावडे, जयश्री पावडे, महेंद्र पिंपळे, अपर्णा नेरलकर, फारूक अली खान, राजू काळे, चित्रा गायकवाड, दीपाली मोरे, अंबिका काकडे यांची उपस्थिती होती.खा.चव्हाण म्हणाले, देशातून भाजपाला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. आधी मनपावर व त्यानंतर देश आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे. या सरकारने महागाई वाढविली. सामान्यांचे जगणे अवघड केले.पेट्रोलचे भाव वाढविले, रेशन दुकानावरील साखर बंद केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना बदलण्याचे काम हे सरकार करीत आहेत. मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचे पातक मोदी व फडणवीस करीत आहेत.देशामध्ये मनूवाद आणण्याचा आरएसएसने कट रचला आहे. दलित वस्ती विकासासाठी आलेला ३० कोटी रुपयांचा निधी या शासनाने महापालिकेला दिला नाही. मागील तीन वर्षांपासून महापालिकेला दोन्ही शासनाकडून एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मत मागण्याचा भाजपाला अधिकार नाही, असेही ते म्हणाले.यावेळी आ. डी. पी. सावंत म्हणाले, जेएनएनयुआरएम व गुरु - त्ता- गद्दीच्या माध्यमातून शहराचा मोठा विकास झाला. नांदेडकरांसाठी विकास लांब नाही. कारण त्यांच्या जवळ खा. अशोकराव चव्हाण यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व आहे.काँग्रेस पक्ष सामाजिक सलोखा राखण्यामध्ये पुढाकार घेतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारसरणीला मानणारा हा पक्ष आहे. खा.अशोकराव चव्हाण हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. अशोकरावांनी बावरीनगरचा विकास करण्यासाठी मोठा निधी दिला. या भागाचा संपूर्ण विकास होण्यासाठी पुन्हा एकदा खा.अशोकराव चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.