शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गावपातळीवर भरणार आता जनता दरबार

By admin | Updated: July 1, 2017 00:26 IST

नांदेड: गेल्या अनेक वर्षांचा मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढायचा असून त्यासाठी वीज ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेवर विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: गेल्या अनेक वर्षांचा मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढायचा असून त्यासाठी वीज ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेवर विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे़ जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या असून त्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे़ तसेच यापुढील काळात गावपातळीवर शाखा अभियंत्यांनी प्रत्येक वीजग्राहकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात़ त्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करावे अशा सूचना दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली़ बावनकुळे म्हणाले, महापारेषणला सक्षम करण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात ३०७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत़ आता महावितरणकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ त्यामध्ये शहरात सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी ४१ कोटी, कृषी पंपासाठी ५६ कोटी अशाप्रकारे जिल्हाभरात महावितरणसाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ शेतकऱ्यांसाठी कृषी सौर वाहिनी सुरु करण्यात येणार आहे़ ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत़ शाळा डिजिटल करण्याच्या अभियानात या शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे़ त्याचबरोबर कंत्राटदरांची एकाधिकारशाही मोडून काढून काढण्यासाठी बी. ई. इलेक्ट्रीकल या विषयातील विद्यार्थ्यांची नोंदणी करुन १५ लाखांपर्यंतची कामे त्यांना देण्यात यावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत़ मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा एचआरए बंद करण्यात येणार आहे़ रिक्त असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागाही लवकरच भरण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले़ तत्पूर्वी झालेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली़