शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

आता रुग्णांची गैरसोय टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:51 IST

जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची असे एकूण २८४ पदे भरली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु होती. हे पदे भरली मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदाचे काय?असा सवाल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची असे एकूण २८४ पदे भरली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित उमेदवारांकडून अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरु होती. हे पदे भरली मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदाचे काय?असा सवाल होत आहे.जिल्ह्यात विविध रुग्णालयात मनुष्यबळा अभावी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एवढेच काय तर रुग्णांना कधी काळी अर्ध्यावर उपचार सोडूनही परतावे लागत होते. आता मात्र ही वेळ तूर्तास टळण्यास मदत होणार आहे.औरंगाबाद येथे सात दिवसांपूर्वी भरती प्रकिया पूर्ण झाली. मात्र सलग सुट्ट्या असल्याने उमेदवार येऊ शकले नाहीत. त्यामुळे सोमवारी दुपारपासून या उमेदवारांची रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय, औढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय, आ. बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालय, राज्य राखील पोलीस बल गट क्र. १२ हिंगोली, या ठिकाणी वर्ग ३ व ४ ची पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाºया रुग्णांची गैरसोयी पासून सुटका होणार आहे. तसेच पदे भरण्यात आल्यामुळे पूर्वी कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मध्ये समाधान व्यक्त होत आहे.आता त्यांच्यावरीलही कामाचा भर कमी होण्यास मदत होणार आहे. विविध रुग्णालयातील वर्ग ३ व ४ ची पदे भरले जात असले तरी विविध डॉक्टरांची रिक्त असलेल्या पदामुळे व कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे स्वत:चे दवाखाने असल्याने रुग्णांना ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे याकडेही जरा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरुन डॉक्टरांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होऊन त्याला आपल्या घरी परतता येईल.