शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

विकास कामांचा आता ‘स्पॉट’ पंचनामा !

By admin | Updated: May 21, 2014 00:14 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात राबविलेल्या विविध विकासकामांचा अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे हे स्पॉटपंचनामा करत आहेत़

बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात राबविलेल्या विविध विकासकामांचा अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे हे स्पॉटपंचनामा करत आहेत़ त्यामुळे अनियमितता करणार्‍यांची अक्षरश: झोप उडाली आहे़ मंगळवारी पहिल्याच दिवशी कोल्हे यांनी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर परिसरात पाहणी केली़ समाजकल्याण विभाग, तेरावा वित्त आयोग, झेडपीआर, दलित वस्ती विकास योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला आहे़ मात्र, या कामांचा दर्जा राखला आहे की नाही? याची खातरजमा झाली नव्हती़ काही कामांच्या गुणवत्तांबाबत तक्रारीही आल्या होत्या़ त्यानुषंगाने अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभागांना पत्र पाठवून किती कामे सुरु आहेत?, किती प्रशासकीय मान्यता दिल्या?, किती कामांची बिले अदा केली? याची माहिती मागविली; परंतु अद्याप कोल्हे यांना ही माहिती मिळालेली नाही़ त्यामुळे या दोन्ही विभाग संशयाच्या भोवर्‍यात आडकले आहेत़ तरतूद कमी असताना जास्तीची बिले अदा करणारा लेखा व वित्त विभागही चौकशीच्या फेर्‍यात आहे़ दरम्यान, मंगळवारी अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी पाटोदा तालुक्यातील अंमळनेर परिसरात दलित वस्ती, झेडपीआरमधून केलेल्या कामांची पाहणी केली़ यासंदर्भात डॉ़ कोल्हे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दुजोरा दिला़ विकासकामांची पाहणी कुठल्या एका भागात नव्हे तर जिल्हाभर करण्यात येणार आहे़ कामांमध्ये दर्जा आहे की नाही याची खात्री केली जात आहे़ (प्रतिनिधी) उपाध्यक्ष पती बैठकीत! मंगळवारी सायंकाळी अतिरिक्त सीईओ डॉ़ अशोक कोल्हे यांनी आपल्या दालनात बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली़ या बैठकीला उपाध्यक्ष अर्चना आडसकर यांनाही पाचारण केले होेते; परंतु त्यांच्याऐवजी त्यांचे पती रमेश आडसकर यांनीच हजेरी लावली़ कामांमध्ये दर्जा राखा, अनियमितता करु नका अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा शब्दांत डॉ़ कोल्हे यांनी त्यांना सुनावले़ रमेश आडसकर यांनी देखील अधिकार्‍यांना सूचना केल्या़