शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिषदेच्या ब्रिगेडियरसह सात जणांना खंडपीठाकडून नोटिसा

By admin | Updated: January 2, 2015 00:50 IST

औरंगाबाद : औरंगाबाद उच्च न्यायालयाने प्रतिवादी संरक्षण विभागाचे सचिव, पुणे येथील कमांडिंग आॅफिसर आणि औरंगाबाद लष्करी छावणीचे ब्रिगेडियर यांच्यासह सात जणांना नोटिसा काढल्या आहेत.

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ७ मधून निवडणूक लढवीत असलेल्या एका उमेदवाराला लष्कराची निवासस्थाने असलेल्या परिसरात प्रचार करण्यास निर्बंध घातल्याप्रकरणी दाखल याचिकेत औरंगाबाद उच्च न्यायालयाने प्रतिवादी संरक्षण विभागाचे सचिव, पुणे येथील कमांडिंग आॅफिसर आणि औरंगाबाद लष्करी छावणीचे ब्रिगेडियर यांच्यासह सात जणांना नोटिसा काढल्या आहेत.छावणी परिषदेची सध्या पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. १४ सदस्य असलेल्या छावणी परिषदेतील सात सदस्य हे ब्रिगेडियर सूचित असतात. तर सात सदस्य हे निवडणुकीद्वारे नागरिकांमधून निवडले जातात. सात सदस्यांची निवड करण्यासाठी ११ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आर्मी अ‍ॅक्ट १९५० आणि आर्मी रूल १९५४ नुसार लष्कराच्या निवासस्थानामध्ये राहणाऱ्या तसेच विद्यमान अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना निवडणूक लढविता येत नाही आणि निवडणुकीचा प्रचारही करता येत नाही. लष्करी निवासस्थानात राहणारी एका अधिकाऱ्याची पत्नी अर्चना सरकटे निवडणूक लढवीत आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना एका कर्नलने सूचक म्हणून सही केली. तर दुसऱ्या अर्जावर एका लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीने सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे. या दोन्ही अर्जांना त्याच वॉर्डातून निवडणूक लढवीत असलेल्या प्रतिभा करणसिंग काकस यांनी आक्षेप घेतला. तेव्हा कर्नलने सही केलेला अर्ज बाद ठरविण्यात आला. अन्य अर्ज मात्र, त्यांनी कायम ठेवला. तसेच याचिकाकर्त्यांना लष्करी अधिकारी, कर्मचारी राहत असलेल्या भागात प्रचार करण्यास मनाई केली आहे. उलट त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार लष्करी निवासस्थानात राहत आहे. त्यामुळे प्रतिभा काकस यांनी आपला हा आक्षेप संरक्षण मंत्रालय दिल्ली, पुणे येथील संरक्षण विभागाच्या गव्हर्निंग आॅफिसर आणि स्थानिक स्टेशनप्रमुख असलेल्या ब्रिगेडियर यांना कळविला. मात्र, त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने काकस यांनी अ‍ॅड. पालोदकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. ही याचिका न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्यासमोर सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून याचिकेची सुनावणी ५ जानेवारी रोजी ठेवली.