शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईओं’ना नोटीस बजावण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात दोन वर्षांपासून निधी पडून असतानादेखील अनुदानित वसतिगृहांना निधी देण्यास दिरंगाई केल्याचे प्रकरण जास्तच चिघळले असून, समाजकल्याण सचिवांनी तत्कालीन समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांना कारणेदर्शक नोटीस बजावली असून, मुख्य कार्यकारी अधिकाºयांना नोटीस बजावण्यासंबंधी ग्रामविकास विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात दोन वर्षांपासून निधी पडून असतानादेखील अनुदानित वसतिगृहांना निधी देण्यास दिरंगाई केल्याचे प्रकरण जास्तच चिघळले असून, समाजकल्याण सचिवांनी तत्कालीन समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांना कारणेदर्शक नोटीस बजावली असून, मुख्य कार्यकारी अधिकाºयांना नोटीस बजावण्यासंबंधी ग्रामविकास विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात ५५ अनुदानित वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृह चालकांनी अनुदानासाठी सातत्याने समाजकल्याण अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले. निवेदने दिली. पाठपुरावा केला; पण तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा व तत्कालीन समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी अनुदान वाटप केले नाही. जिल्हा परिषदेच्या तिजोरीत गेल्या वर्षाची १ कोटी ८० हजार रुपये व चालू वर्षात ७० हजार रुपयांची अनुदानाची रक्कम पडून आहे; परंतु त्रयस्थ अधिकाºयांकडून चौकशीचा बनाव करीत या अधिकाºयांनी अनुदान वाटप केले नाही. शासन निर्णयानुसार वसतिगृहांची तपासणी न करता जून-जुलैमध्ये ६० टक्के अनुदान वितरित करावे व नोव्हेंबरनंतर वसतिगृहांची तपासणी करून ४० टक्के अनुदान वितरित करणे बंधनकारक आहे; मात्र शासन निर्णयाला बगल देत वसतिगृहचालकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी तपासणीचा बनाव करण्यात आला.यासंदर्भात वसतिगृहचालक संघटनेचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे व सचिव भीमराव हत्तीअंबिरे यांनी समाजकल्याण विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीनुसार सचिवांनी याप्रकरणी समाजकल्याण आयुक्तांमार्फत जि.प. समाजकल्याण विभागात जाऊन स्वतंत्र चौकशी केली. त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा व तत्कालीन समाजकल्याण अधिकारी मडावी व लेखा विभागातील कारकून काकडे यांची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल पाठविण्याचे आदेश समाजकल्याण सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना दिले होते; मात्र अद्यापपर्यंत जि.प.कडून चौकशी अहवाल पाठविण्यात न आल्यामुळे समाजकल्याण अधिकारी मडावी यांना दोषी धरून त्यांना कारणेदर्शक नोटीस बजावण्यात आली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामविकास विभागांतर्गत येत असल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यासंबंधी समाजकल्याण आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.