लातूर : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी गेल्या ९ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे विविध कामांसाठी विद्यार्थी, नागरिक हैराण झाले आहेत़ दरम्यान, जिल्हा परिषदेने संपकरी ग्रामसेवकांना दोनदा नोटीसा बजावल्या आहेत़ या संबंधित ग्रामसेवकांना नोटिसा पोहोचल्या नसल्याने केवळ नोटिसा देण्याचा सोपस्कार पूर्ण झाल्याचे पहावयास मिळत आहे़जिल्ह्यात ७८७ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींसाठी १०० ग्रामविकास अधिकारी आणि ४११ ग्रामसेवक आहेत़ तसेच ९७ कंत्राटी ग्रामसेवक आहेत़ कंत्राटी ग्रामसेवक वगळता अन्य ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी वेतन त्रुटी दूर करावी़ ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरु करावी़ कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकांप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून ग्राह्य धरावा़ २० ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे अशा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे़ हे आंदोलन सुरु होऊन नऊ दिवस उलटले आहे़ परंतु, अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़सध्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थी विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी धावपळीत आहेत़ त्याचबरोबर नागरिकही विविध कामानिमित्ताने दररोज ग्रामपंचायतीकडे ये- जा करीत आहेत़ परंतु, ग्रामसेवकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, नागरिक त्रस्त आहेत़ विद्यार्थी, नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून २३ विस्तार अधिकारी आणि ९७ कंत्राटी ग्रामसेवकांवर अतिरिक्त भार टाकण्यात आला असून प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकास किमान १० ते १२ गावांचे काम पहावे लागत आहे़ परंतु, हे कर्मचारी एक- दोन दिवसांत सर्वच गावांत पोहोचू शकत नसल्याने होणारी अडचण कमी झाली नाही़ ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून जि.प.ने सुरुवातीस दोन दिवसांच्या कालावधीची, त्यानंतर सात दिवसांत कामावर हजर व्हा अशा आशयाची दुसरी नोटीस बजावली आहे़ परंतु, नोटिसाच पोेहोचल्या नाहीत. नोटिसीचा केवळ सोपस्कार केल्याचे दिसते आहे. (प्रतिनिधी)काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील १०० ग्रामविकास अधिकाऱ्यांना आणि ४११ ग्रामसेवकांना दोनदा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ त्यात हजर राहण्याचे निर्देश आहेत. तरीही ते कामावर हजर होत नसतील तर डेप्युटी सीईओ डॉ. संजय तुबाकले यांनी सांगितले.
नोटिसांचा सोपस्कार !
By admin | Updated: July 11, 2014 00:58 IST