शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुरूम बाजार समितीला नोटीस

By admin | Updated: April 30, 2017 23:59 IST

उमरगा :मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव व संचालक मंडळाने केलेला खुलासाही असमाधानकारक वाटल्याने जिल्हा उपनिबंधकांनी कार्यवाही करण्यात येईल’ असा इशारा दिला.

उमरगा : मराठवाड्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण केलेल्या मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात गैरव्यवहार व अनियमितता होत असल्याची तक्रार आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार याची चौकशी करण्यात आली. यात अनेक गैरप्रकार समोर आल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी समितीचे सभापती, संचालक मंडळासह सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु, सचिव व संचालक मंडळाने केलेला खुलासाही असमाधानकारक वाटल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ‘प्रशासक का नेमू नये याचा खुलासा १५ दिवसात लेखी सदर करा, अन्यथा समितीविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल’ असा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे. मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होते. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या आवकमध्ये वाढ झाली होती. परंतु, बाजार समितीने १ जानेवारी २०१७ पासून अचानक तुरीचा लिलाव बंद केला, तसेच आडत दुकानदारांचे परवाना नूतनीकरण अर्ज घेऊनही परवाने नूतनीकरणकरिता शुल्क भरून घेतले नाही, यासह अन्य आरोप करत समितीच्या गैरकाराभाराची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू मिनियार यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. या मागणीवरून जिल्हा उपनिबंधकांनी सहायक निबंधक यांना चौकशीचे आदेश दिले होते. सहायक निबंधकांनी केलेल्या चौकशीअंती बाजार समितीने डिसेंबर २०१६ ते १८ मार्च २०१७ या कालावधीत ४८३५ क्विंटल तूर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी-विक्री केल्याचे रजिस्टरच्या नोंदीत दिसून आले आहे. यात गंभीर बाब म्हणजे सचिवाच्या लेखी सांगण्यावर १४४१३.९३ क्विंटल तूर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी-विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रजिस्टरमधील नोंदीत आणि सचिवाने दिलेल्या माहितीत तूर खरेदी-विक्रीमध्ये मोठी तफावत असल्याचे म्हटले आहे. अशातच चौकशी दरम्यान बाजार समितीमध्ये आलेल्या तुरीच्या आवकबद्दल समितीने टोकन पास, शेतकऱ्यांचे नाव, वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव याबद्दलची सविस्तर माहिती नोंदविली गेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तुरीची आवक किती झाली? किती विक्री झाली? कोणत्या दराने व्यवहार झाला? याची अचूक माहिती मिळाली नसल्यामुळे बाजार समितीने तूर खरेदी-विक्रीत गैरव्यवहार केला आहे, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. तुरीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबद्दल बाजार समितीच्या दप्तरी मोठी तफावत असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय या चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्याने बाजार समितीमधील बऱ्याच आडत दुकानांची पाहणी केली असता जवळपास ५० ते ६० हजार क्विंटल तूर आडत्यांकडे शिल्लक असल्याचे सकृतदर्शनी दिसून आलेले आहे. त्यामुळे आडत्याकडे आलेल्या शिल्लक तुरीची नोंद बाजार समितीकडे का नाही? अशी विचारणा करत बाजार समिती व आडत्यांकडून संगनमताने ५० ते ६० हजार क्विंटल तुरीच्या खरेदी-विक्रीत गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने समितीविरूद्ध तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशा स्वरूपाचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना दिला होता. त्यावर समितीचे सभापती, संचालक मंडळासह सचिवाला नोटीस देवून पंधरा दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. संंबंधितांनी खुलासा सादर केला. परंतु, तो खुलासा असमाधानकारक असल्याचे सांगत समितीवर प्रशासक का नेमू नये? अशी विचारणा करणारी नोटीस देण्यात आली आहे. सदरील नोटिसेचे उत्तर देण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. (वार्ताहर)