शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांना मनपाकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:44 IST

कार्यारंभ आदेश देवूनही कामाला प्रारंभ न करणाºया कंत्राटदारांना महापालिकेने नोटीसा बजावल्या असून दोन दिवसात कामाला प्रारंभ करुन महिनाभरात कामे पूर्ण करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. कामे पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कार्यारंभ आदेश देवूनही कामाला प्रारंभ न करणाºया कंत्राटदारांना महापालिकेने नोटीसा बजावल्या असून दोन दिवसात कामाला प्रारंभ करुन महिनाभरात कामे पूर्ण करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. कामे पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शहरातील अनेक कामे सुरू करण्याचे आदेश महापालिकेने त्या त्या कंत्राटदारांना दिले होते. मात्र कार्यारंभ आदेश मिळूनही कामे सुरू झाली नसल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने सदरील कंत्राटदारांना ३० आॅक्टोबर रोजी नोटीस बजावल्या आहेत.त्यामध्ये पाणी पुरवठा, मलनि:सारण योजना, रस्ते आदी कामांचा समावेश आहे. महापालिकेने नोटीसा दिलेल्या कंत्राटदारांमध्ये सोहेल कन्स्ट्रक्शन, मोईज पठाण, शिवाजी इंगळे, मे. प्रविण कन्स्ट्रक्शन, स्मीता पांढरे, अबचलनगर, इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारांचा समावेश आहे. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. शास्त्री आणि महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांनी या नोटीस बजावल्या आहेत. दोन दिवसात कामे सुरू करुन ती कामे २५ नोव्हेंबर तसेच ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सदर कंत्राटदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्याकडील कामे काढून घेताना त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.महापालिका निवडणुकीनंतर प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याचे प्रयत्न आयुक्त गणेश देशमुख यांनी सुरू केले आहेत. त्यांनी स्वत: शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करुन नागरिकांसाठी समस्या ठरलेले प्रश्न सोडविण्यास ते प्रयत्न सुरू केले आहेत. देशमुख यांनी स्वत: कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक कामे सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.असे असताना कार्यारंभ आदेश देवूनही कामे सुरू नसल्याचे उघड झाल्यानंतर कंत्राटदारांना नोटीसा बजावल्या आहेत. महापालिकेने पहिल्यांदाच कंत्राटदारांना कामासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसा मिळाल्यानंतर तरी कंत्राटदार कामे सुरू करतील काय? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.