शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बड्या थकबाकीदारांना नोटीस

By admin | Updated: March 11, 2017 00:24 IST

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या बिगर शेतीच्या थकबाकीदारांविरूध्द कर्जवसुलीची मोहीम जिल्हा बँकेने पुन्हा हाती घेतली आहे़

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या बिगर शेतीच्या थकबाकीदारांविरूध्द कर्जवसुलीची मोहीम जिल्हा बँकेने पुन्हा हाती घेतली आहे़ थकबाकीदारांना अंतिम नोटीस देऊन पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे़ मुदतीत कर्जभरणा न करणाऱ्या कर्जदारांच्या घरासमोरच ठिय्या मांडून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात येणार आहे़ दरम्यान, शुक्रवारी जिल्हा बँकेच्या ६० कर्मचाऱ्यांनी एकत्रित फिरून ९१० जणांना नोटिसा दिल्या आहेत़रोखे घोटाळा, विनातारण कर्जवाटप, थकित कर्ज आदी विविध कारणांनी जिल्हा बँक अडचणीत आली आहे़ नाबार्ड आणि सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातील कमकुवत व आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या बँकांवर विभागीय सहनिबंधक अधिकाऱ्यांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे़ जिल्हा बँकेची जबाबदारी असलेले लातूर येथील सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी कर्जवसुलीसाठी बैठक घेऊन कर्जवसुली मोहीम सक्तीने राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत़ कर्जवसुलीसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक यु़एल़पवार यांना कर्ज वसुली मोहिमेवर दैनंदिन स्वरूपाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने बिगर शेती थकित कर्जदारांना नोटीसा देण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे़ कारखाने वगळता इतर बिगर शेती कर्जदार संस्थांकडे जवळपास २२ कोटी रूपयांची थकबाकी आहे़ शुक्रवारी शहरासह परिसरातील ९१० थकित कर्जदारांना अंतिम नोटीस देण्यात आली आहे़ या नोटिसीत पाच दिवसात कर्जभरणा न केल्यास थकबाकीदार संस्थांच्या पदाधिकारी, सदस्यांच्या घरासमोर गांधीगिरी करून ठिय्या मांडला जाणार असल्याचे ही नमूद केले आहे़ विशेष म्हणजे या आंदोलनात ठेवीदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आल्याचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांनी सांगितले़ दरम्यान, बँकेची ही आक्रमक भूमिका यापुढील काळातही कायम राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.