शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गृह विभागासह साखर आयुक्त व इतर प्रतिवाद्यांना खंडपीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:33 IST

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रस्तावित चतुर्वेदेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी २००० साली समभागाद्वारे पैसे जमा करून कारखान्याच्या नावे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली; मात्र अद्याप कारखाना सुरू केला नसून सदर जमीन स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

ठळक मुद्देमंत्री लोणीकर यांच्या प्रस्तावित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या जमिनीचे प्रकरण

औरंगाबाद : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रस्तावित चतुर्वेदेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी २००० साली समभागाद्वारे पैसे जमा करून कारखान्याच्या नावे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली; मात्र अद्याप कारखाना सुरू केला नसून सदर जमीन स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.यासंदर्भात प्रशासनाच्या विविध विभागांना निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. अरुण ढवळे यांनी मंत्री लोणीकर यांना वगळता प्रतिवादी गृहविभाग, साखर आयुक्त आणि सहआयुक्त, पुणे, विभागीय सहसंचालक (साखर), जालन्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आष्टीचे पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.मंत्री लोणीकरांनी २००० साली जालना जिल्ह्यात चतुर्वेदेश्वर साखर कारखाना म. लोणी खुर्द (ता. परतूर) या नावाने सुरू करण्यासाठी समभागाद्वारे (शेअर्स) पैसे जमा के ले. शेअर्सच्या पैशातून लोणीकर मुख्य प्रवर्तक असलेल्या चतुर्वेदेश्वर कारखान्याच्या नावे जमिनी घेतल्या; परंतु कारखाना मात्र अद्यापपर्यंत अस्तित्वात आला नाही. जमिनी घेतल्यानंतर त्यांची नोंद कारखान्याच्या नावे फेरफार व सातबारावर घेण्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये सदरील जमिनी लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे करण्यास सुरुवात झाली. सदर माहिती याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी माहिती अधिकारात मिळविली. कारखान्यासंबंधी सहसंचालक औरंगाबाद (साखर), साखर संचालक पुणे यांच्याकडे माहिती मागविली असता चतुर्वेदेश्वर नावाने कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनानेही कारखान्याच्या नावावर खाजगी अथवा सहकारी तत्त्वावर परवानगी दिली नसल्याचे समोर आले आहे. याविरुद्ध जालना पोलीस अधीक्षकांना लोणीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बळीराम कडपे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. याचिकेत लोणीकरांसह, राज्य शासन, गृह विभाग, साखर आयुक्त पुणे, सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहसंचालक (साखर) औरंगाबाद , जिल्हा पोलीस अधीक्षक जालना, पोलीस निरीक्षक आष्टी आदींना प्रतिवादी करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मंत्री लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेची पुढील सुनावणी १० जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे काम पाहत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCourtन्यायालयBabanrao Looneykarबबनराव लोणीकर