औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील करबुडवेगिरी प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात संबंधितांना खुलासा मागण्यात आला आहे.ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना ६०० पेक्षा अधिक वाहनांनी नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिवहन आयुक्तांनी मुंबईहून या प्रकरणाच्या तपासासाठी पथक पाठविले होते. या पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल परिवहन आयुक्तांना देण्यात आला. आरटीओ कार्यालयातील या ‘करबुडवेगिरी’ प्रकरणाच्या अहवालात सहा अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्रत्येक अधिकाऱ्यांचा किती सहभाग आहे, याची चौकशी करण्यात आली. यामध्ये कोणी किती रुपयांचा महसूल बुडविला, याची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून उत्तरे प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘करबुडवेगिरी’त दोषींना नोटिसा
By admin | Updated: July 7, 2016 23:54 IST